Success Story : 12 एकरात केळीसह 4 पिकांची शेती; इंजिनिअर तरुण करतोय लाखोंची कमाई!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या काळात शेतीला विशेष महत्व प्राप्त (Success Story) झाले असून, अनेक सुशिक्षित तरुण देखील नोकरीच्या मागे न लागता शेतीमध्ये आपले नशीब आजमावत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील कोठली येथील सागर पाटील या तरुणाने देखील आपल्या शिक्षणाचा शेतीमध्ये वापर करून मोठी प्रगती साधली आहे. या तरुणाने पाण्याचे सुयोग्य नियोजन करून आपल्या 12 एकरात केळी, कारले, लाल मिरची, पपई यांची लागवड केली असून, त्यातून तो लाखोंची कमाई करत आहे. आज आपण या तरुण शेतकऱ्याची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत.

उच्चशिक्षित असूनही धरली शेतीची वाट (Success Story Of Nandurbar Farmer)

सागर पाटील हा नंदुरबारपासून 12 किलोमीटरवर असलेल्या कोठली या गावचा रहिवासी आहे. त्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले असून, सोबतच बीएससी ऍग्री ही पदवी (Success Story) देखील पूर्ण केली आहे. मात्र, या दोन उच्चशिक्षणाच्या पदव्या हाती असताना ही सागरने नोकरीच्या मागे न मागता शेतीला आपले भविष्य समजून त्यात झोकून दिले. सागरची वडिलोपार्जित 35 एकर जमीन असून, वडील शांतीलाल पाटील आणि तो मोठ्या जिकरीने शेतीमध्ये कष्ट घेत आहे.

सिंचनव्यवस्था केली बळकट

2015 साली सागरने प्रथमच शेती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर काही काळ शेती केल्यानंतर 2020 साली त्याने दुष्काळी स्थिती अनुभवली. त्यामुळे सिंचनव्यवस्था बळकट करण्यासाठी कोणतीही सरकारी मदत न घेता परिसरात त्याने लोकवर्गणीतून 40 लाखांचे नाल्यांचे काम केले. आणि आपल्यासह आसपासच्या शेतकऱ्यांची प्रगती साधली. त्यामुळे त्याला शेती सिंचनासाठी सध्या पाण्याची कोणतीही अडचण येत नाही.

चार पिकांमधून लाखोंची कमाई

सागरने आपल्या शेतात 3 एकरात केळी, 3 एकरात लाल मिरची, 3 एकरात पपई आणि अन्य 3 एकरात कारली लागवड केली आहे. या चारही पिकांमध्ये सागरने मागील काही काळात मास्टरी मिळवली असून, तो या पिकांमधून लाखोंचे उत्पन्न घेत असल्याचे सांगतो. शेतीसाठी योग्य नियोजन, शेतीतील अडथळे आणि पाणी नियोजनाचे महत्व समजल्याने आपल्याला नफ्याच्या शेतीकडे वळता आल्याचे तो सांगतो.

निर्यातक्षम मालाचे उत्पादन

निर्यातक्षम मालाचे उत्पादन घेत असल्याने, सागर आपली केळी आणि लाल मिरची बाहेरच्या देशात निर्यात करतात. त्यांच्याकडे तीन बोअरवेल, एक विहीर, मोठा ट्रॅक्टर व चार बारमाही मजूर अशी यंत्रणा आहे. 2019 मध्ये केलेल्या आपल्या बोअरवेलला चांगले पाणी लागल्याने आपल्या एकूण 35 एकर जमिनिपैकी 12 एकर जमीन ठिबकद्वारे बागायती करण्यात आपल्याला यश आल्याचे सागर पाटील शेवटी सांगतो.

error: Content is protected !!