Success Story : नादच खुळा! 1 एकर शेतीतून शेतकऱ्याने आल्याचे घेतले 50 गाड्या उत्पादन; कस केलं नियोजन? जाणुन घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Success Story : बऱ्याच शेतकऱ्यांना शेतजमीन ही कमी असते यावेळी शेतकरी बाजारपेठेचा योग्य अभ्यास करून पिकांची लागवड करत असतात. बरेच शेतकरी सध्या शेतीमध्ये पारंपारिक पिके सोडून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करत आहेत. यामुळे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. याचेच एक उदाहरण आपण आज पाहणार आहोत. सातारा जिल्ह्यातील एकंबे या ठिकाणच्या युवा शेतकऱ्यांनी आले शेतीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न घेतले आहे.

एक एकर मधून काढले भरघोस उत्पन्न

साताऱ्या मधील युवा शेतकरी अजय चव्हाण हे शेतीमध्ये आले लागवड करतात. यावेळी त्यांनी एका एकर मधून तब्बल 50 गाड्या आल्याचे उत्पन्न घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मे 2022 मध्ये आल्याची लागवड केली व योग्य व्यवस्थापन करून त्यांना चांगले उत्पादन मिळले आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

कस केलं नियोजन?

मे 2022 मध्ये या शेतकऱ्याने एक एकर मध्ये आल्याची लागवड केली व त्याची खांदणी 2023 मध्ये केली. यामध्ये त्यांनी काही खतांचा देखील वापर केला आहे. यामध्ये त्यांनी प्रामुख्यानेनिंबोळी पेंड, निम ऊर्जा सुपर, नोवाटेक प्रो व एप्पल जी या खतांचा प्रामुख्याने वापर केला आहे. त्यामुळे त्यांना आले पिकातून चांगले भरघोस उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबर त्यांनी धनश्री कंपनीची वॉटर सोल्युबल खते व त्यासोबतच 0:40:37,09:46,14:48 हायड्रो स्पीड त्यांनी ड्रिप मधून आले पिकाला दिले आहे.

त्यांनी आल्याची शेती करताना एकदम व्यवस्थितपणे सर्व गोष्टींचे नियोजन केले. या नियोजनामध्ये त्यांनी कोणताही खंड पडू दिला नाही. त्यांनी शेती करत असताना सेंद्रिय तसेच रासायनिक खतांचा योग्य वापर केल्यामुळे त्यांना चांगले उत्पन्न मिळवणे शक्य झाले आहे. आले शेती करण्यासाठी या युवा शेतकऱ्याला कृषी कांचनचे संचालक असलेले नितीन भोसले यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

याबाबत बोलताना शेतकऱ्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, कोणतीही शेती करायची म्हटली तरी मार्गदर्शन खूप महत्त्वाचे असते परंतु तरीदेखील तुम्ही नियोजन आणि वेळ व त्या नियोजनाची केलेली अंमलबजावणी खूप गरजेचे असते. असे केल्यास तुम्ही देखील एक यशस्वी शेतकरी होऊ शकता. त्यांनी देखील योग्य नियोजन केले असून त्यांनी एका एकर मध्ये 50 गाडी आल्याचे उत्पन्न मिळवले आहे.

error: Content is protected !!