Sugar Council : आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : “आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या (आयएसओ) 63 व्या परिषदेसाठी वर्ष 2024 साठीचे अध्यक्षपद (Sugar Council) भारताकडे देण्यात आले आहे. त्यामुळे आता 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे (Sugar Council) नेतृत्व भारत करणार असून, ही भारतासाठी गौरवाची बाब आहे. साखर क्षेत्रात देशाची वाढती पत यावरून दिसून येते.” असे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजीव चोपडा यांनी म्हटले आहे.

भारताच्या अध्यक्षपदाबाबत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात त्यांनी ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे मुख्यालय लंडन येथे आहे. भारताला 2024 मधील आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आयएसओच्या सर्व सदस्य देशांच्या समर्थन आणि सहयोगाची आवश्यकता आहे. या काळात जागतिक पातळीवरील ऊस शेती, साखर आणि इथेनॉल निर्मिती याकरता सर्व सदस्य देशांना एकत्र आणण्याचे प्रयत्न भारताकडून केले जाणार आहे. असेही चोपडा यांनी या पत्रकात म्हटले आहे.

जागतिक बाजारावर थेट परिणाम (Sugar Council India Holds The Presidency)


भारत जगातील सर्वात मोठा साखर मागणी असणारा आणि दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक देश आहे. एकूण वार्षिक जागतिक साखर मागणीपैकी जवळपास 15 टक्के मागणी ही भारतात असते. आणि साखरेच्या एकूण जागतिक उत्पादनापैकी 20 टक्के साखरेचे उत्पादन देशात होते. त्यामुळे भारतीय साखर क्षेत्रातील चढ-उतरांचा जागतिक बाजारावर थेट परिणाम होत असतो. आणि हीच भारताची जमेची बाजू असल्याने आयएसओचे नेतृत्व करण्यासाठी भारत यावर्षी प्रबळ दावेदार मानला गेला आहे. असेही चोपडा यांनी म्हटले आहे.

हरित ऊर्जेचा प्रसाराचे प्रयत्न

वैश्विक साखर बाजारात पश्चिम गोलार्धात ब्राझील तर पूर्व गोलार्धात भारत आघाडीवर आहे. इथेनॉल निर्मितीत भारत तिसऱ्या स्थानी असल्याने हरित ऊर्जेच्या जागतिक पातळीवरील प्रसारासाठी यावेळी काम करण्यात येणार आहे. तसेच वाढीव साखर निर्मितीचे रूपांतर इथेनॉल स्वरूपात जैव इंधनामध्ये रूपांतरीत करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. भारतीय साखर उद्योगाने जागतिक व्यापार मॉडेलला शाश्वत आणि लाभदायी बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे.

error: Content is protected !!