Sugar Export: इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने सरकारला 1 दशलक्ष टन साखर निर्यातीला परवानगी देण्याची केली विनंती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: हंगामाच्या अखेरीस साखरेचे चांगले स्टॉक (Sugar Export) होणे अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने सरकारला चालू 2023-24 हंगामात 10 लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी देण्याची विनंती केली आहे,

एका निवेदनात ISMA ने म्हटले आहे की, चालू हंगामाच्या मार्चपर्यंत साखरेचे उत्पादन (Sugar production) 300.77 लाख टनांच्या तुलनेत 302.20 लाख टनांवर पोहोचले आहे.

साखरेचा हंगाम (Sugar Season) ऑक्टोबर ते सप्टेंबरपर्यंत चालतो. सध्या देशातून साखरेच्या निर्यातीवर निर्बंध (Sugar Export Ban) आहेत. मार्चच्या मध्यात, ISMA ने 2023-24 हंगामातील साखर उत्पादनाचा अंदाज सुधारून 320 लाख टन केला.

निर्यातीची विनंती देशांतर्गत वापराच्या गरजा पूर्ण करणे, इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम (EBP) टिकवून ठेवणे आणि निर्यातीच्या संधींसाठी अतिरिक्त लाभ मिळवणे यामध्ये काळजीपूर्वक संतुलन ठेवण्यासाठी सुचविले आहे.

इंडस्ट्री बॉडीने सांगितले की, हवामान अंदाज करणाऱ्या एजन्सींनी 2024 सालासाठी दक्षिण-पश्चिम मॉन्सून सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. परिणामी, 2024-25 हंगामात मध्यम गाळप हंगाम अपेक्षित आहे.

error: Content is protected !!