Sugar Factory : राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आजपासून सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आजपासून (1 नोव्हेंबर) राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम (Sugar Factory) सुरू झाला आहे. राज्य सरकारने परवानगी दिली होती. सध्या दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याचा अभाव याचा फटका ऊस उत्पादनाला सुद्धा बसला आहे. त्यामुळे यंदा 90 दिवस कारखाना चालेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पाण्याच्या अभावामुळे ऊस उत्पादनात जवळपास 30 टक्कयांनी घट होण्याची चिन्हे असून त्याचा थेट परिणाम साखर निर्मितीवर होणार आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांकडून पाण्याअभावी आपला ऊस जनावरांना चारा म्हणून विक्री करण्यास पसंती दिली जात आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांसमोर हंगाम सुरु करण्यासाठी अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

कोल्हापुरात प्रति टन 3100 रुपये दर- Sugar Factory

त्यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे यावर्षीचा ऊस गाळप हंगाम दबक्या पावलांनीच सुरू होणार असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांनी उसाला प्रति टन 3100 रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. मात्र संघटनेला हा दर मान्य नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप सुरु होण्यास अडचण निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी नुकताच बावची, पोखर्णी, ढवळी, नागाव, भडकंबे, कोरेगाव व शिगाव या गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी उपस्थित ऊस उत्पादक शेतकरी व सर्व संबंधित घटकांनी कारखान्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले आहे.

दरम्यान, सांगलीच्या बामणी (पारे) येथील उदगिरी साखर कारखान्याच्या गाळपाचा (Sugar Factory) शुभारंभ आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते आज (१ नोव्हेंबर) करण्यात आला. यावेळी ऊस सिंचनाकरिता कृष्णा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तातडीने विशेष बैठकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता, कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी तातडीने सोडणे आवश्यक आहे. याशिवाय टेंभूचे पाणी शेतीसाठी मिळण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!