Sugar Price : साखरेच्या दरात वाढ होण्याची शक्यता; ‘सेंट्रम ब्रोकिंग’च्या रिपोर्टमध्ये माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात यावर्षीच्या गाळप हंगामात समाधानकारक साखर उत्पादन (Sugar Price) झाले आहे. ज्यामुळे सध्या राज्यासह देशातंर्गत बाजारात साखरेचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, चालू एप्रिल महिन्यात गाळप हंगाम आटोपल्यानंतर साधारणपणे जून ते ऑक्टोबर या ऑफ सिझनमध्ये साखरेच्या दरात (Sugar Price) वाढ होण्याची शक्यता आहे. असे ‘सेंट्रम ब्रोकिंग’ या शेअर बाजारातील आघाडीच्या संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

सध्या साखरेचे दर स्थिर (Sugar Price Centrum Broking Report)

साखर दराबाबतच्या या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सध्याच्या घडीला देशातंर्गत बाजारात साखरेचे दर (Sugar Price) स्थिर आहे. उत्तरप्रदेश या राज्यामध्ये सध्या साखरेचे दर 37.5 रुपये प्रति किलो तर महाराष्ट्रामध्ये साखरेचे दर 34 रुपये प्रति किलो इतके आहे. अर्थात सध्या साखरेचे स्थिर असले तरी पुढील वर्षीचा ऊस गाळप सुरु होण्याआधी ऑफ सीझनमध्ये साखरेचे दर वाढलेले पाहायला मिळू शकतात. 31 मार्चपर्यंत देशात 2950 लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 3050 लाख टन इतके नोंदवले गेले होते. सध्या हंगाम सुरूच असल्याने, हे लक्ष्य सहज पार होऊ शकते. असेही अहवालात म्हटले आहे.

आतापर्यंत 10.5 टक्के साखर उतारा

विशेष म्हणजे यंदा योग्य त्या पाऊस नसतानाही साखर उतारा चांगला मिळाला आहे. देशपातळीवर आतापर्यंत 10.5 टक्के साखर उतारा मिळाला आहे. जो यंदाच्या हंगामासाठी चांगले संकेत आहे. परिणामी साखर उतारा चांगला असल्याने, साखर उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. यंदा देशात एकूण 320 लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे. जी मागील वर्षीच्या गाळप हंगामात 330 लाख टन नोंदवली गेली होती. असेही ‘सेंट्रम ब्रोकिंग’ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

उत्पादनात महाराष्ट्राची मुसंडी

यंदाच्या गाळप हंगामाच्या सुरुवातीला देशातील साखर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता सर्वच संस्थांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, महाराष्ट्र राज्याने शेवटच्या टप्प्यात साखर उत्पादनात मुसंडी मारल्याने, राष्ट्रीय पातळीवर साखर उत्पादनात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. अशातच आता साखर उद्योगातील आघाडीची संस्था असलेल्या इस्माने 10 लाख टन साखर निर्यातीस (Sugar Export) परवानगी देण्यात यावी. अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

error: Content is protected !!