Sugar Price : दिवाळीच्या काळात कसे आहेत साखरेचे दर; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी रविवारी असून सर्वत्र उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळीनिमित्त सगळ्यांचीच जय्यत तयारी सुरु असून आपण या सणाला घरी गोडधोड पदार्थ बनवत असतो. यामुळे साहजिकच साखर मोठ्या प्रमाणात लागते. अशा वेळी साखरेच्या किमती वाढतील असा आपला अंदाज असतो. मात्र यंदा दिवाळीनिमित्त साखरेची मागणी वाढली असली तरी देशांतर्गत बाजारात साखरेच्या किमती स्थिर (Sugar Price) आहेत. याउलट आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात मात्र तेजी असल्याचे पाहायला मिळत आहेत.

ब्राझील आणि थायलंड या प्रमुख साखर उत्पादक देशांनी साखरेऐवजी इथेनॉल निर्मितीस प्राधान्य दिल्याने पुरवठ्यात घट होऊन दर तेजीत (Sugar Price) असल्याचे सांगितले जात आहे. या देशांनी आपला कल इथेनॉल निर्मितीकडे वळवल्याने जागतिक पातळीवर साखरेच्या एकूण उत्पादनात १.२ टक्क्यांनी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी 2023-2024 या वर्षात जागतिक साखर उत्पादनात २.१ दशलक्ष टन इतकी घट नोंदवली जाऊ शकते. त्याचाच परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे.

साखर कोटा निश्चित (Sugar Price)

देशातंर्गत बाजारात साखरेचे स्थिर आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार सातत्याने साखरेच्या किमतींवर लक्ष ठेऊन आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात कारखान्यांना साखर विक्रीसाठीचा कोटा निश्चित करून दिला आहे. नोव्हेंबर महिन्यासाठी सरकारने कारखान्यांना १५ लाख टन साखरेचा कोटा निश्चित करून दिला आहे. सध्या मुंबईमध्ये एम-30 साखरेचा दर (एम-30 म्हणजे गुणवत्तापूर्ण साखर) 38.50 रुपये प्रति किलो, कानपूरमध्ये (एम-30) साखरेचा दर 39.30 रुपये प्रति किलो, कोलकाता येथे (एम-30) साखरेचा दर 39.80 रुपये प्रति किलो तर मुझफ्फरनगरमध्ये (एम-30) साखरेचा दर 39.30 रुपये प्रति किलो (Sugar Price) इतका आहे.

सरकारच्या प्रयत्नांना यश

‘श्री रेणुका शुगर्स’चे कार्यकारी अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी सांगितले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमती आक्रमकपणे वाढत आहेत. मात्र असे असले तरी त्याचा भारतीय ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. कारण सरकारने अगदी वेळेत सतत आढावा घेऊन स्थानिक बाजारात दर वाढू नये, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारावर आंतराष्ट्रीय पातळीवरील साखरेच्या चढत्या दराचा कोणताही परिणाम दिसून येत नाहीये. असेही ते यावेळी म्हणाले.

error: Content is protected !!