Sugar Production : देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट; पहा राज्यनिहाय उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे देशातील पाऊसमान कमी राहिले. त्याचा देशभरातील ऊस (Sugar Production) शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा आता साखर उत्पादनावर परिणाम झाला असून, यावर्षीच्या गाळप हंगामात (1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर) देशातील साखर उत्पादनात 11 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. यावर्षी देशभरात आतापर्यंत 74.05 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 82.95 लाख टन (Sugar Production) इतके नोंदवले गेले होते. देशातील साखर कारखान्यांची शिखर संस्था असेलल्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) याबाबत माहिती जाहीर केली आहे.

भारत हा ब्राझीलनंतर जगातील दुसरा सर्वात मोठा साखर उत्पादक (Sugar Production) देश म्हणून ओळखला जातो. मात्र यावर्षी देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील साखर उत्पादन कमी होण्यामागे दुष्काळी परिस्थिती हे प्रमुख कारण आहे. या दोन राज्यांमध्ये झालेल्या साखर उत्पादनातील घटीमुळे देशातील साखर उत्पादनावर परिणाम झाल्याचे इस्माने आपल्या अहवालात म्हटले आहे. याशिवाय यावर्षी, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील साखर कारखाने गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 10 ते 15 दिवस उशिराने सुरू झाले आहेत. सध्या देशातील चालू कारखान्यांची संख्या वार्षिक आधारावर केवळ 497 इतकी आहे. असेही इस्मा या संघटनेने म्हटले आहे.

राज्यनिहाय साखर उत्पादन (Sugar Production Decline In Country)

दरम्यान, यावर्षी 1 ऑक्टोबर ते 15 डिसेंबर या साखर वर्षात महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन 33.02 लाख टनांवरुन 24.45 लाख टनांवर (Sugar Production) घसरले आहे. अर्थात यावर्षी महाराष्ट्रात मागील वर्षीच्या तुलनेत 8.57 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. कर्नाटकातील उत्पादन 19.20 लाख टनांवरून 16.95 लाख टनांवर घसरले आहे. अर्थात यावर्षी कर्नाटकातील साखर उत्पादन यावर्षी 2.25 लाख टनांनी कमी झाले आहे. मात्र असे असले तरी उत्तरप्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन यावर्षी वाढले आहे. 2023-24 च्या गाळप हंगामात उत्तर प्रदेशमध्ये साखरेचे उत्पादन 22.11 लाख टन झाले आहे. तर एका वर्षापूर्वी याच कालावधीत ते 20.26 लाख टन नोंदवले गेले होते.

साखर निर्यातीवर बंदी

इस्माने मागील आठवड्यात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार (Sugar Production) चालू वर्षीच्या गाळप हंगामात 2023-24 मध्ये एकूण साखर उत्पादन 325 लाख टन (इथेनॉलचा वापर न करता) होण्याची शक्यता आहे. याशिवाय देशात सध्या 56 लाख टन साखरेचा साठा शिल्लक असून, 285 लाख टन साखरेची मागणी राहण्याची शक्यता आहे. असेही इस्माने आपल्या सुधारित अंदाजात म्हटले होते. दरम्यान देशांतर्गत बाजारात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने यावर्षी साखर निर्यातीवर पूर्णतः बंदी कायम ठेवली आहे.

error: Content is protected !!