Sugar Production : यावर्षी 179.89 दशलक्ष टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने (आयएसओ) 2022-23 यावर्षी जगभरात 179.89 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा (Sugar Production) अंदाज व्यक्त केला आहे. साखरेच्या किमती 12 वर्षाच्या विक्रमी पातळीवर पोहचल्यानंतर आता त्यात काहीशी उतरण पाहायला मिळत आहे. त्यातच आता जागतिक बाजारात साखरेच्या दरात २७.२० सेंटपर्यंत घसरण झाली आहे.

2022-23 यावर्षीच्या साखर हंगामात जागतिक पातळीवर 179.89 दशलक्ष टन साखर उत्पादन (Sugar Production) होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी 2021-22 याच कालावधीत 178.33 दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात यावर्षीच्या साखर उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत 0.87 टक्के साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. असे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने म्हटले आहे.

साखरेच्या मागणीत १.२४ टक्के वाढ (Sugar Production)

2022-23 यावर्षी जगभरात 180.22 दशलक्ष टन इतकी साखरेची मागणी असणार आहे. मागील वर्षी 2021-22 च्या हंगामात 178.02 दशलक्ष टन साखरेची मागणी नोंदवली गेली होती. अर्थात यावर्षी 1.24 टक्के अधिक साखरेची मागणी असणार आहे. 9 नोव्हेंबर 2023 रोजी जागतिक बाजारात साखरेच्या किमती मागील 12 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहचल्या होत्या. जागतिक बाजारात साखरेचे दर 28 सेंट प्रति पाउंडपेक्षा अधिक वाढले होते. मात्र आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने व्यक्त केलेल्या अंदाजानंतर आता साखरेच्या किमती 27.20 सेंट प्रति पाउंडपर्यंत घसरल्या आहेत.

आयात-निर्यातीत घट

याशिवाय जागतिक बाजारात यावर्षी आयात मागणी 66.07 दशलक्ष टनांवरून कमी होऊन, ती 65.01 दशलक्ष टन इतकी राहिली आहे. तर निर्यात मागणी ही 2021-22 च्या 65.7 दशलक्ष टनांच्या तुलनेत यावर्षी 64.76 दशलक्ष टन इतकी नोंदवली गेली आहे. यंदा अधिक उत्पादन होऊनही मागील वर्षीच्या 0.31 दशलक्ष टन अतिरिक्त उत्पन्नाच्या तुलनेत यावर्षी 0.34 दशलक्ष टन कमी साखरेचे उत्पादन होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!