Sugar Production : यावर्षी देशात 281 लाख टन साखर उत्पादित; 161 कारखाने बंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 च्या ऊस गाळप हंगामामध्ये आतापर्यंत (15 मार्च 2024) देशातील साखर उत्पादन (Sugar Production) 280.79 लाख टन इतके नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 282.60 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आतापर्यंत एकूण 2 लाख टन साखर उत्पादन कमी झाले आहे. अशी माहिती भारतीय साखर कारखाना असोशिएशनकडून (इस्मा) जारी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने उत्तरप्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात वाढ झाली आहे. तर अन्य राज्यांमध्ये साखर उत्पादनात (Sugar Production) घट नोंदवली गेली आहे.

161 कारखान्यांनी गाळप थांबवले (Sugar Production 280.79 Lakh Tonnes)

इस्माच्या आकडेवारीनुसार, यावर्षी देशात गाळप सुरु असलेल्या कारखान्यांची संख्या सध्या 371 इतकी आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 325 इतकी होती. अर्थात यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक साखर कारखाने सुरु असूनही साखर उत्पादनात घट नोंदवली गेली आहे. 15 मार्च 2024 पर्यंत देशातील 161 साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे. मागील वर्षी याच कालावधीत 208 कारखान्यांनी आपले गाळप थांबवले होते. सध्याच्या घडीला महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये कारखान्यांना उसाची उपलब्धता अजूनही सुरू असल्याने, गाळप हंगाम लांबला आहे.

उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये अधिक उत्पादन

उत्तरप्रदेशमध्ये 15 मार्च 2024 पर्यंत 88.40 लाख टन साखर उत्पादन (Sugar Production) होत आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 79.63 लाख टन इतके नोंदवले गेले होते. तर गुजरात राज्यात आतापर्यंत 8.88 लाख टन साखर उत्पादन नोंदवले गेले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 8.87 लाख टन इतके नोंदवले गेले होते. अर्थात उत्तरप्रदेश आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये यंदा मागील वर्षीच्या तुलनेत अधिक साखर उत्पादन झाले आहे. याउलट महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी साखर उत्पादन नोंदवले गेले आहे.

340 लाख टन उत्पादनाची शक्यता

महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये अनेक उसाची उपलब्धता पूर्वीपेक्षा अधिक आहे. ज्यामुळे या दोन राज्यांमध्ये ऊस गाळप हंगाम लांबला आहे. अशातच इस्माच्या अंदाजानुसार, यंदाच्या संपूर्ण गाळप हंगामात देशातील साखर उत्पादन 340 लाख टन इतके होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षीच्या हंगामात एकूण 330.90 लाख टन इतके नोंदवले गेले होते.

error: Content is protected !!