Sugar Production : यंदा देशात 330.5 लाख टन साखर उत्पादित होणार; इस्माची माहिती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 यावर्षीच्या गाळप हंगामात (ऑक्टोबर 2023 ते सप्टेंबर 2024) देशातील साखर उत्पादनात (Sugar Production) 10 टक्क्यांनी घसरण होऊन, ते 330.5 लाख टन होण्याचा अंदाज आहे. अशी माहिती चालू गाळप वर्षातील दुसऱ्या आगाऊ अंदाजाबाबत देशातील साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या इस्मा अर्थात भारतीय साखर कारखाना संघाकडून (Sugar Production) जाहीर करण्यात आली आहे.

35.7 लाख टनांची घसरण (Sugar Production In India)

मागील वर्षीच्या (२०२२-२३) गाळप हंगामात साखरेचे 366.2 लाख टन इतके उत्पादन झाले होते. अर्थात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या हंगामात साखर उत्पादनात (Sugar Production) 35.7 लाख टनांची घसरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्र सरकारने यावर्षी आतापर्यंत केवळ 17 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्यास परवानगी दिली आहे. साखर उत्पादनात घट होण्याची शक्यता पाहता केंद्राकडून उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे आतापर्यंतची 17 लाख टन साखर (इथेनॉल निर्मिती साठीची) वगळता देशात यावर्षी एकूण 313.5 लाख टन साखर उत्पादन होऊ शकते. असेही इस्माने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

84.5 लाख टन साखर शिल्लक राहणार

दरम्यान, मागील 2022-23 च्या गाळप हंगामात देशातील साखर उत्पादन 328.2 लाख टन इतके नोंदवले गेले होते. तर 38 लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी वळविण्यात आली होती. अर्थात मागील वर्षीच्या गाळप हंगामात एकूण 366.2 लाख टन साखर उत्पादन झाले होते. यावर्षीच्या गाळप हंगामाला सुरुवात होताना 1 ऑक्टोबर रोजी मागील हंगामातील देशात एकूण 56 लाख टन साखर शिल्लक होती. जी यावर्षीच्या 313.5 लाख टन साखर उत्पादनाच्या अंदाजानुसार, 1 ऑक्टोबर 2024 रोजी 84.5 लाख टन असेल, असा अंदाजही इस्माकडून जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, यावर्षीच्या गाळप हंगामात केंद्र सरकारकडून आणखी 18 लाख टन इथेनॉल निर्मितीकडे वळवण्यास परवानगी दिली जाऊ शकते. असेही इस्माने म्हटले आहे. तर इस्माच्या आकडेवारीनुसार, 31 जानेवारी 2024 पर्यंत देशात 187.2 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत 195 लाख टन इतके नोंदवले गेले होते.

error: Content is protected !!