Sugar Production : महाराष्ट्राचा साखर उत्पादनात दबदबा; आतापर्यंत 95 लाख टन साखर उत्पादित!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील ऊस गाळप (Sugar Production) हंगाम शेवटाला आला असताना, काही कारखान्यांनी सध्या चांगलाच जोर पकडला आहे. ज्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील कारखान्यांनी एकूण 944.82 लाख टन उसाचे गाळप केले आहे. ज्यातून आतापर्यंत राज्यात एकूण 95.29 लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) झाले आहे. अशी माहिती साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

आतापर्यंत 22 कारखाने बंद (Sugar Production In Maharashtra)

राज्यात यावर्षी एकूण 211 साखर कारखान्यांनी आपले गाळप सुरु केले होते. त्यापैकी सध्याच्या घडीला एकूण 22 कारखान्यांनी आपला गाळप हंगाम थांबवला आहे. मागील वर्षी याच कालावधीत एकूण 211 साखर कारखान्यांनी 998.17 लाख टन उसाचे गाळप केले होते. ज्यातून राज्यात एकूण 99.12 लाख टन साखर उत्पादित (Sugar Production) झाली होती. दरम्यान, राज्यातील साखर उत्पादनात आणखी मार्चअखेर वाढ होण्याची शक्यता आहे. असेही साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.

देशातील एकूण उत्पादनाच्या 36 टक्के

दरम्यान, राज्यातील साखर उत्पादन चालू वर्षीच्या हंगामात सुरुवातीला काहीसे पिछाडीवर होते. मात्र सध्या त्यात चांगलीच वाढ दिसून आली असून, ते ऑक्टोबर 2023 ते मार्च 24 या कालावधीत आतापर्यंत 95 लाख टनांपर्यंत पोहचले आहे. देशात सध्याच्या घडीला आतापर्यंत एकूण 264 लाख टन साखर उत्पादन नोंदवले गेले आहे. अर्थात राज्यात सध्या नोंदवले गेलेले साखर उत्पादन देशातील एकूण साखर उत्पादनाच्या ३६ टक्के इतके आहे. असेही साखर आयुक्तालयाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

विभागनिहाय बंद कारखान्यांची संख्या

राज्यात मागील वर्षीच्या हंगामात एकूण 105 लाख टन साखर उत्पादन नोंदवले गेले होते. त्यापेक्षा यंदा साखर उत्पादन काहीसे कमी राहण्याची शक्यता आहे. सध्यस्थितीत राज्यात कोल्हापूर विभागातील 2, सोलापूर विभागातील 7, पुणे विभागातील 4, अहमदनगर विभागातील 2, संभाजीनगर विभागातील 6 आणि नांदेड विभागातील एका साखर कारखान्याने आपले गाळप थांबवले आहे. उर्वरित कारखान्यांचे गाळप सुरू असून, मार्च अखेरपर्यंत राज्यातील साखर उत्पादनात आणखी भर पडेल, असेही साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.

error: Content is protected !!