हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील साखरेचा पुरवठा सुरळीत राहून दरवाढ होऊ नये. यासाठी इथेनॉलऐवजी साखरेच्या उत्पादनावर (Sugar Production) भर दिला जाणार आहे. त्यामुळे 2023-24 या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये देशातील साखर कारखान्यांनाकडून उत्पादित होणाऱ्या एकूण साखरेपैकी (Sugar Production) केवळ 30 ते 35 लाख साखरेच्या समतुल्य इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते. असे सरकारच्या पातळीवरून सांगितले जात आहे.
2023-24 मध्ये प्रामुख्याने देशातील एकूण साखर उत्पादन हे 335 लाख टन इतके राहण्याची (Sugar Production) शक्यता आहे. यातील केवळ 35 लाख टन साखरेच्या समतुल्य उसापासून इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते. मागील गाळप हंगामात 40 लाख टन साखरेच्या समतुल्य ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वापरला गेला होता. दरम्यान, 35 लाख टनांपेक्षा अधिक साखरेच्या समतुल्य ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वापरला गेल्यास साखरेच्या साठ्यात घट होऊन दरवाढ होऊ शकते. असेही सांगितले जात आहे.
दरवाढीची चिंता (Sugar Production Priority In India)
दरम्यान, गेल्या नोव्हेंबर महिन्यात देशातील साखर उत्पादनात 8 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. ऊस पुरवठा हा इथेनॉल निर्मितीसाठी वापरला जाणे हे साखर उत्पादनासाठी धोकादायक असून, साखरेचे उत्पादन अल्प प्रमाणात राहू शकते. ज्यामुळे त्याचा थेट दरावर परिणाम होईल, अशी चिंताही साखर उद्योगातून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारकडून केवळ साखरेचे अल्प प्रमाण असलेल्या निकृष्ट दर्जाच्या चौथ्यापासून इथेनॉल निर्मिती करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने हंगामाच्या सुरुवातीला आपल्या अंदाजात यावर्षी 290 लाख टन साखरेचे उत्पादन, तर 40 लाख टन साखर उत्पादनाच्या समतुल्य उसाचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील हंगामात पेट्रोलमध्ये 12 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य झाले आहे. तर यावर्षी 15 टक्के मिश्रणाचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.