Sugar Production : इथेनॉलच्या उत्पादनात वाढ तर साखरेत घट, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यंदाचा म्हणजेच २०२२ – २३ या वर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम (Sugarcane Season) शेवटच्या टप्प्यात आला आहे. तर काही ठिकाणी या हंगामाचा शेवट झाला आहे. यावरून आता साखर, इथेनॉलचे एकूण उत्पादन किती झाले? त्याचप्रमाणे गळीत हंगामाची नेमकी काय वैशिष्टे आहेत? यावर आता राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी माध्यमांशी संवाद साधून याबाबत माहिती दिली आहे.

काय म्हणाले शेखर गायकवाड?

माध्यमांशी बोलताना त्यांनी साखर आणि इथेनॉलच्या उत्पादनावर भाष्य करत राज्यातील कारखान्यांबाबत ते म्हणाले, “आजच्या घडीला राज्यात २१० साखर कारखान्यांपैकी 155 साखर कारखान्यांच्या आसपास गाळप बंद केली. फक्त राज्यात ५५ कारखाने सुरू आहेत. गळीपाच्या शेवटच्या टप्प्यात असताना १०५ लाख साखरेचे उत्पादन झाले. १०४२ लाख ऊसाचे गाळप झाले. मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी वेग जास्त होता.”

“मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षीचा वेग जलद”

“मागील वर्षी १५ जून पर्यंत साखर कारखाने चालू होते. त्यामुळे ऊसाचा खप देखील उशिरा झाला. यामुळे ऊस कारखान्याला देण्यासाठी शेतकऱ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. मात्र यंदा तशी परिस्थिती नाही. इथेनॉलच्या उत्पादनातही वाढ होणार” असल्याची शक्यता गायकवाड यांनी केली. त्यांनी यंदाच्या गळीत हंगामाची वैशिष्टे देखील सांगितली आहेत.

यंदाच्या गळीत हंगामाची वैशिष्टे

  • यंदाच्या वर्षी २१० गाळप कारखान्यांनी ऊसाचं गाळप केलं. आतापर्यंत कधीच इतक्या अधिक प्रमाणात ऊसाचं गाळप केलं नव्हतं.
  • बंद पडलेले २४ कारखाने यंदा सुरू झाले.
  • दररोज गाळप क्षमता दीड लाख टनांनी वाढली.
  • मागील वर्षी ११० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले. यंदा १३० कोटी लिटरहून अधिक इथेनॉलचे उत्पादन झाले.

यंदाच्या वर्षी ऊस उत्पादनात घट

“मागील वर्षी जून , ऑगस्टपर्यंत सतत पाऊस पडत असल्याने उसाची वाढ झाली नाही. पश्चिम महाराष्ट्रात ऊसाची घट झाली. ४० ते ४५ कांड्यांपर्यंत ऊस जातो तसा २० कांड्यांपर्यंत ऊस गेला. यामुळे ऊसाच्या उत्पादनात ३० टक्क्याने घट झाल्याचं गायकवाड म्हणाले. गळीत हंगाम १५ ऑक्टोंबरपासून सुरू झाला. यावर्षी १४. ८७ लाख हेक्टर ऊसाचं क्षेत्र होतं.” अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!