Sugarcane : राज्यातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या उसाची 1500 कोटींची थकबाकी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीच्या गाळप हंगामात 31 जानेवारी 2024 पर्यंत राज्यात कारखान्यांनी 726.53 लाख टन उसाचे (Sugarcane) गाळप केले आहे. या एकूण उसाच्या रकमेपैकी रास्त आणि किफायतशीर दराचे (एफआरपी) 91.45 टक्के अर्थात 16 हजार 126 कोटी रुपये त्या-त्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर (Sugarcane) जमा केले आहेत. अशी माहिती साखर आयुतलयाकडून जारी करण्यात आली आहे.

1 हजार 507 कोटींची थकबाकी (Sugarcane 1500 Crore Dues Of Farmers)

तर यावर्षीच्या हंगामात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना आणखी 1 हजार 507 कोटी रुपयांची थकबाकी देणे बाकी आहे. यामध्ये ११२ साखर कारखान्यांचा समावेश असून, त्यांनी शेतकऱ्यांचे एफआरपीचे संपूर्ण पैसे दिलेले नाही. अर्थात यावर्षीच्या गाळप हंगामात आतापर्यंत एकूण 17 हजार 633 कोटींचा ऊस गाळप करण्यात आला आहे. असेही साखर आयुक्तालयाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

94 कारखान्यांकडून संपूर्ण पैसे अदा

31 जानेवारी 2024 पर्यंत राज्यातील २०७ साखर कारखान्यांनी 726.53 लाख टन उसाचे (Sugarcane) गाळप केले आहे. यातील ९४ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकूण तोडणी, वाहतूक खर्चासह त्यांच्या उसाचे सर्व १०० टक्के पैसे बँक खात्यांमध्ये जमा केले आहेत. तर ४९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ८० ते ९९ टक्के इतकी एफआरपीची रक्कम अदा केली आहे. याशिवाय ३३ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे 60 ते 79 टक्के पैसे बँक खात्यांमध्ये दिले आहेत.

30 कारखान्यांची निम्मी थकबाकी

दरम्यान, राज्यातील ३० साखर कारखान्यांनी आपल्या शेतकऱ्यांना केवळ 0 ते 59 टक्के उसाची रक्कम दिली आहे. अर्थात या कारखान्यांकडे अजूनही शेतकऱ्यांचे निम्मे एफआरपीची थकबाकी शिल्लक आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील अंदाजित 75 लाख टन ऊस गाळपासाठी अजूनही शिल्लक असून, सध्या जिल्ह्यात 9.83 टक्के साखर उताऱ्यासह 74 लाख 73 हजार 265 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. असेही साखर आयुक्तालयाने आपल्या आकडेवारीत म्हटले आहे.

error: Content is protected !!