हॅलो कृषी ऑनलाईन : 12 ते 14 जानेवारी 2024 दरम्यान पुण्याच्या वसंतदादा शुगर (Sugarcane) इन्स्टिट्यूटमध्ये तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने व संधी’ ही यावर्षीच्या परिषेदेची थीम (Sugarcane) असणार असून, या परिषदेमध्ये देश-विदेशांतील सुमारे दोन हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित यापूर्वीच्या दोन्ही साखर (Sugarcane) परिषदांना मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता तिसऱ्या परिषदेसाठीच्या आयोजनाची तयारी सुरु करण्यात आली आहे. याबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढावा घेतला आहे. इन्स्टिट्यूटचे सल्लागार शिवाजी देशमुख, महासंचालक संभाजी कडू-पाटील यांनी आगामी परिषदेच्या नियोजनाबाबत पवार यांना माहिती दिली आहे. पहिली साखर परिषद 2016 रोजी यशस्वीपणे आयोजित करण्यात आल्यानंतर दुसरी साखर परिषद 2020 मध्ये पार पडली होती. तर आता होणाऱ्या या तिसऱ्या परिषदेमध्ये जगभरातील 200 पेक्षा जास्त सेवा पुरवठादारांना भेटण्याची संधी या निमित्ताने मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
भव्य प्रदर्शनाचेही आयोजन (Sugarcane Conference Vasantdada Sugar Institute)
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून साखर उद्योगासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची परिषद व प्रदर्शन भरविण्यास प्रारंभ झाला. यापूर्वीच्या दोन्ही साखर परिषदांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता ‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने व संधी’ या विषयावर होत असलेल्या या परिषदेसाठी मांजरी येथे फार्मवर एका भव्य प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार आहे. देश-विदेशातील शास्त्रज्ञ, तज्ज्ञ या परिषदेत साखर उद्योग व संलग्न क्षेत्रावर सादरीकरण करणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने होत असलेल्या प्रदर्शनात जागतिक साखर उद्योगाच्या उभारणीतील सध्याची प्रगत उत्पादने, सेवा यांची माहिती मिळणार आहे.