Sugarcane Cultivation : उत्तरप्रदेशने करून दाखवलं; यंदा 7 वर्षातील सर्वाधिक ऊस लागवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : 2023-24 हे वर्ष राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी (Sugarcane Cultivation) निराशाजनक ठरले. यावर्षी मान्सूनवर एल निनोचा प्रभाव असल्याने देशातील अनेक भागांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. ज्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांमध्ये तर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ऊस उत्पादनासह साखर उत्पादनात मोठी घट नोंदवली गेली आहे. मात्र अशा परिस्थितीतही उत्तरप्रदेशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी खंबीरपणे ऊस लागवड केली. विशेष म्हणजे उत्तरप्रदेशात मागील 7 वर्षांमधील सर्वाधिक ऊस लागवड (Sugarcane Cultivation) झाली आहे. अशी माहिती उत्तरप्रदेश सरकारकडून अधिककृतरित्या जाहीर करण्यात आली आहे.

29.66 लाख हेक्टरवर लागवड (Sugarcane Cultivation In Uttar Pradesh)

यावर्षी उत्तरप्रदेशातील शेतकऱ्यांचा ऊस शेतीकडे मोठ्या प्रमाणात कल वाढला असून, मागील सात वर्षातील विक्रमी ऊस लागवड राज्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, 2023-24 यावर्षी उत्तरप्रदेशात विक्रमी 29.66 लाख हेक्टरवर शेतकऱ्यांकडून ऊस लागवड करण्यात आली आहे. जी मागील सात वर्षातील सर्वाधिक ऊस लागवड ठरली असल्याचे उत्तरप्रदेश सरकारने आपल्या माहितीपत्रकात म्हटले आहे. याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांना या वाढलेल्या ऊस क्षेत्रामुळे मोठा फायदा झाला आहे, असेही युपी सरकारने म्हटले आहे.

46.10 लाख टन साखर उत्पादन

दरम्यान, यावर्षी देशातील साखर उत्पादनात आतापर्यंत मोठी घट नोंदवली गेली आहे. मागील वर्षी साखर उत्पादनात प्रथम स्थानी असलेल्या महाराष्ट्र या आघाडीच्या राज्यातही यंदा साखर उत्पादन घटले आहे. तर दुष्काळी परिस्थितीमुळे कर्नाटकातही साखर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. असे असतानाही उत्तरप्रदेश या राज्यात आतापर्यत (15 जानेवारी) 465.66 लाख टन उसाचे गाळप झाले असून, त्याद्वारे 46.10 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. अशी माहिती देशातील साखर कारखान्यांची शिखर संस्था असलेल्या नेशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव शुगर फैक्ट्रीज लिमिटेडकडून आपल्या आकडेवारीमध्ये नमूद करण्यात आली आहे.

error: Content is protected !!