Sugarcane : ऊसतोड कामगारांबाबत सरकारचा मोठा निर्णय; उचलले महत्त्वाचे पाऊल!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून गोपीनाथ मुंडे ऊसतोड (Sugarcane) कामगार कल्याण महामंडळ आणि भगवानबाबा सरकारी वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी वसतिगृह चालविले जाते. राज्यात सरकारकडून 82 पैकी 20 वसतिगृहे सुरु असून, उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे (Sugarcane) यांनी दिली आहे.

सध्या 20 वसतिगृहे सुरु (Hostel For Sugarcane Cutting Worker Childrens)

राज्य सरकारच्या या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये 100 क्षमतेचे मुला-मुलींसाठी स्वतंत्र असे एकूण 82 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानुसार सध्या बीड, अहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाडेतत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. यातील 5 वसतीगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी आतापर्यंत प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी सरकारने उपलब्ध करून दिला आहे. असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

उर्वरित 62 वसतिगृहांना परवानगी

वसतिगृह योजनेतील उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यात यावेत, याबाबत मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आता आणखी 31 तालुक्यात ही 62 वसतिगृहे उभारली जाणार आहे. ही वसतिगृहे सुरुवातीस भाडेतत्वावर जागा घेत चालवली जाणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून ही वसतिगृहे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी खुली करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने वसतिगृहे स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवली जातील. असेही ते म्हणाले आहे.ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये. यासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांची शाळेसह निवास व भोजनाची उत्तम सोय व्हावी. यासाठी ही वसतिगृहे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. ऊसतोड कामगारांच्या पुढील पिढ्यांच्या हातात कोयता येऊ नये. यासाठी सरकारचे हे अत्यंत मोठे पाऊल ठरणार आहे.

प्रत्येक ठिकाणी, प्रत्येकी 2 वसतिगृहे

  • बीड जिल्हा – वडवणी, धारूर, शिरूर कासार, आष्टी, अंबाजोगाई
  • अहमदनगर – शेवगाव
  • जालना – परतूर, बदनापूर, जालना, मंठा
  • नांदेड – कंधार, मुखेड, लोहा
  • परभणी – गंगाखेड, पालम, सोनपेठ
  • धाराशिव – कळंब, भूम, परांडा
  • लातूर – रेणापूर, जळकोट
  • छत्रपती संभाजीनगर – पैठण, सोयगाव, सिल्लोड
  • नाशिक – निफाड, नांदगाव, येवला, सिन्नर
  • जळगाव – एरंडोल, यावल, चाळीसगाव
error: Content is protected !!