Sugarcane : ऊस गाळप हंगाम लांबणीवर; राज्यात अजूनही 239 लाख टन ऊस शिल्लक!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षीचा राज्यातील ऊस (Sugarcane) गाळप हंगाम तीन महिन्यातच आवरला जाईल, अशी शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती. मात्र, सध्या राज्यातील साखर कारखान्यांना बऱ्यापैकी उसाची उपलब्धता होत आहे. त्यामुळे राज्यातील ऊस गाळप हंगाम आणखी मार्च अखेरपर्यंत किंवा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसांपर्यंत लांबू शकतो. असा अंदाज साखर (Sugarcane) आयुक्तालयाकडून व्यक्त केला जात आहे.

साखर उत्पादनही वाढणार (Extension Of Sugarcane Harvesting Season)

साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, 31 जानेवारी 2024 पर्यंत चालू गाळप हंगामात राज्यातील साखर कारखान्यांनी 676 लाख टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे राज्यात आतापर्यत 65 लाख टन साखर उत्पादन झाले आहे. आता ऊस गाळप हंगाम लांबल्याने राज्यात आणखी अंदाजित 239 लाख टन ऊस गाळप केला जाऊ शकतो. त्यामुळे राज्यातील एकूण साखर उत्पादन हे 95 लाख टनांपर्यंत पोहचू शकते. असा अंदाजही साखर आयुक्तालयाकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान, सध्यस्थितीत राज्यातील दोन कारखान्यांनी आपले गाळप थांबवले असून, अन्य 205 कारखान्यांचे गाळप सुरु असल्याचेही आयुक्तालयाने म्हटले आहे.

राज्यातील विभागनिहाय ऊस गाळप (साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार)

  • कोल्हापूर…………….157.29 लाख टन
  • पुणे………………….142 लाख टन
  • सोलापूर……………..149 लाख टन
  • अहमदनगर…………..87 लाख टन
  • छत्रपती संभाजीनगर…..64.58 लाख टन
  • नांदेड……………….77.19 लाख टन
  • अमरावती…………..6.4 लाख टन
  • नागपूर……………..2.18 लाख टन

दरम्यान, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेला अवकाळी पाऊस आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसाने ऊस पिकाला फायदा आहे. तर केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंधने घातल्याने, तोही ऊस गाळपासाठी उपलब्ध होत आहे. त्यामुळे आणखी 50 ते 60 दिवस गाळप हंगाम लांबणार आहे. त्यातून राज्याच्या एकूण साखर उत्पादनात वाढ होणार असल्याचेही साखर आयुक्तालयाने म्हटले आहे.

error: Content is protected !!