Sugarcane Farmers : पुढील हंगामापासून राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी होणार!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्र हे देशातील आघाडीवरील ऊस उत्पादक (Sugarcane Farmers) राज्य आहे. याशिवाय उत्तरप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन होते. उत्पादित उसाचा वापर हा साखर उत्पादनासाठी तसेच इथेनॉल निर्मितीसाठी केला जातो. मात्र, केंद्र सरकारकडे ऊस उत्पादनाबाबत आवश्यक ती आकडेवारी उपलब्ध नसते. ज्यामुळे ऐन हंगामात उत्पादित ऊस नेमका साखर उत्पादनासाठी वापरायचा की इथेनॉल निर्मितीसाठी वापरायचा? याबाबत संभ्रम निर्माण होतो. यावर तोडगा काढण्यासाठी पुढील वर्षीच्या ऊस हंगामात महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांची (Sugarcane Farmers) नोंदणी केली जाणार आहे.

इथेनॉल निर्मितीस मदत होणार (Sugarcane Farmers Registered From Next Season)

पुढील वर्षी ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 च्या गाळप हंगामापासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची (Sugarcane Farmers) ऑनलाइन नोंदणी हंगामाच्या सुरुवातीलाच केली जाणार आहे. ज्याद्वारे या दोन्ही राज्य सरकारांकडून एक पोर्टल तयार केले जाईल. ज्यामध्ये ऊस खरेदी करणाऱ्या शेतकरी आणि साखर कारखान्यांचा तपशील नोंदवला जाईल. जेणेकरून साखर उत्पादनाचा अंदाज वास्तविक वेळेत आधीच काढता येईल. तसेच गरजेनुसार ऊस सरकारला इथेनॉल निर्मितीकडे (Sugarcane Farmers) वळवता येईल. असे केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये ‘ई-गन्ना’ ॲप

सध्या घडीला उत्तरप्रदेश या आघाडीच्या ऊस उत्पादक राज्यामध्ये ही प्रणाली वापरली जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये ‘ई-गन्ना’ या मोबाईल ॲपद्वारे राज्यातील साखर उत्पादन आणि राज्यातील एकूण कारखान्यांना होणारा ऊस पुरवठा याची नोंद ठेवली जाते. राज्यातील सुमारे 40 लाख ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Sugarcane Farmers) हे ॲप तयार करण्यात आले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश या राज्याचा धर्तीवर देशातील अन्य प्रमुख ऊस उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात देखील हा पॅटर्न राबविला जाणार आहे. ज्यामुळे ऊस उत्पादनाबाबत तंतोतंत माहिती आगाऊ स्वरूपात मिळण्यास मदत होणार आहे.

साखर उत्पादनात वाढ

दरम्यान, यावर्षी डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच केंद्र सरकारने 31 ऑक्टोबर 2023 नंतर देखील साखर निर्यातीवर बंदी वाढवली होती. ज्यामुळे यंदा उत्पादन काहीसे घटले असले तरी शेवटच्या टप्प्यात ऊस उत्पादनात वाढ झाली आहे. ज्याचा थेट परिणाम साखर उत्पादनात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात आतापर्यंत १०२ क्विंटल साखर उत्पादन नोंदवले गेले आहे. जे ९५ लाख टन या अपेक्षित साखर साखर उत्पादनापेक्षा अधिक आहे. ज्यात आणखी हंगामाच्या शेवटापर्यंत साखर उत्पादन १०५ लाख टनांपर्यंत नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!