Sugarcane Farming : ‘या’ आहेत ऊस लागवडीच्या प्रमुख पद्धती; उत्पादनात होईल मोठी वाढ!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यात ऊस हे प्रमुख पीक असून, मुख्यत्वेकरून पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील (Sugarcane Farming) क्षेत्र सर्वाधिक आहे. राज्यात प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड केली जाते. मात्र, आता ऊस लागवडीच्या अशा काही पद्धती आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना ऊस उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे. याशिवाय ऊस शेतीसाठीच्या पाण्यामध्ये देखील बचत होणार आहे. चला तर मग पाहूया… नेमकी ही ऊस लागवडीच्या (Sugarcane Farming) ‘या’ पद्धती नेमक्या आहे तरी कोणत्या?

‘या’ आहेत दोन महत्वाच्या पद्धती (Sugarcane Farming Methods)

महाराष्ट्रात ऊस लागवडीखालील वर्षागणिक वाढत आहे. राज्यात शेतकरी पारंपारिक सरी-वरंधा पद्धतीने ऊस लागवड करतात. मात्र, ऊस लागवडीची (Sugarcane Farming) ‘नाली पद्धती’ शेतकऱ्यांसाठी प्रभावी ठरत आहे. याशिवाय ‘खड्डा पद्धती’ देखील शेतकऱ्यांना ऊस लागवड करण्यासाठी प्रभावी ठरत आहे. आज आपण ऊस लागवडीच्या दोन्ही पद्धतींबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

1. नाली पद्धती : ऊस लागवडीच्या या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना एक फूट खोल आणि एक फूट रुंद नाली खोदायची आहे. दोन नाल्यांमधील अंतर हे 4 फूट इतके ठेवायचे आहे. उन्हाळयाच्या लागवडीदरम्यान हे अंतर कमी ठेवले तरी चालेल. मात्र ऑक्टोबरच्या लागवडीसाठी हे अंतर 4 फूट असणे आवश्यक असते. या खोदलेल्या नालीमध्ये शेतकऱ्यांना आधीच खतांचा डोस द्यायचा आहे. यामध्ये प्रति हेक्टरी 100 किलो यूरिया, 130 किलो डीएपी आणि 100 किलो पोटॅशचे प्रमाण ठेवायचे आहे. ज्यामुळे उसाच्या उगवणीला फायदा होतो.

2. खड्डा पद्धती : नाली पद्धतीसोबतच सध्या ऊस लागवडीची खड्डा पद्धती देखील मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आहे. या पद्धतीमध्ये एक गोलाकार आकाराचा खड्डा खोदला जातो. गोलाकार पद्धतीने ऊस लागवड केली जाते. कमी पाण्याचा प्रदेश असलेल्या भागात ही पद्धती वरदान ठरली आहे. कारण या पद्धतीमुळे पाण्याची बचत होण्यास मदत होते. याशिवाय उसाच्या उत्पादनात वाढ होण्यास देखील मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या भागातील पाण्याची उपस्थिती लक्षात घेऊन, या दोन्ही पैकी एका पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक ठरते.

error: Content is protected !!