Sugarcane Harvester : ऊसतोडणी यंत्रासाठी सरकार देतंय Rs 35,00,000 अनुदान; असा करा अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sugarcane Harvester : दिवसेंदिवस ऊसतोडणी कामगारांची संख्या कमी होत असून ऊस (Sugarcane) उत्पादनामध्ये मात्र वाढ होत आहे. त्यामुळे ऊस तोडणीवर त्याचा परिणाम दिसून येत असून उसाची वेळेवर तोडणी न केल्यामुळे त्याचा साखर उताऱ्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे ऊसाला कमी भाव मिळतो. ऊस तोडणीची समस्या लक्षात घेऊन राज्य शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्र (शुगर केन हार्वेस्टर) खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

Online अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

यामध्ये सन २०२२-२३ मध्ये ४५० ऊस तोडणी यंत्र व सन २०२३-२४ मध्ये ४५० ऊस तोडणी यंत्र अशा एकूण ९०० ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. यासाठी रु. ३२१.३० कोटी तरतुद करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून सन २०२२-२३ व २०२३-२४ या वर्षांमध्ये ऊस तोडणी यंत्रास अनुदान देण्याबाबत हा शासन निर्णय घेण्यात आला आहे. (Sugarcane Harvester)

अनुदान किती मिळणार? Sugarcane Harvester

ऊस तोडणी यंत्रासाठी (शुगरकेन हार्वेस्टर) अनुदानामध्ये प्रति ऊस तोडणी यंत्राची किंमत रुपये ९० लाख ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना अथवा सहकारी साखर कारखान्यांना यंत्र किमतीच्या ४० टक्के अथवा जास्तीत जास्त रुपये ३५ लाख रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये केंद्र शासनाचा ६० टक्के तर राज्य शासनाचा ४० टक्के हिस्सा असणार आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सहकारी साखर कारखाने, व्यक्ती अथवा त्यांचा समुह गट व स्वयंसहायता गट (एसएचजी) हे अनुदानासाठी पात्र राहतील.

अनुदान मिळवण्यासाठी आजच करा हे काम

शेतकरी मित्रांनो आपल्याला राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा लाभ मिळवायचा असल्यास एक गोष्ट मात्र करावीच लागेल. आजच Hello krushi हे ॲप डाऊनलोड केलं नसेल तर आजच डाऊनलोड करा. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello krushi हे नाव सर्च करा. या ॲपमध्ये आपल्याला आवश्यक अशा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरून अगदी क्षणार्धात एका क्लिकवर माहिती मिळवता येऊ शकते, तसेच ऑनलाईन अर्ज देखील या ॲपद्वारे करता येऊ शकतो. तसेच जमीन मोजणी, सात बारा, शेतकरी दुकान, नकाशा मोजणी, हवामान अंदाज आदी सेवांचा लाभ मिळवता येईल.

error: Content is protected !!