Sugarcane Harvesting : ऊस तोडणी करताय? ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; उताऱ्यासह वाढेल उत्पादन!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये ऊस तोडणी (Sugarcane Harvesting) हंगाम जोरात सुरू असून, शेतकरी आपला ऊस कारखान्यांना पाठवत आहेत. मात्र ऊस तोडणी दरम्यान काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. अन्यथा ऊस तोडणी दरम्यान केलेल्या चुकांमुळे उसाचे वजन, गुणवत्ता, साखर उतारा यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही तर वेळेआधी किंवा तोडणीस विलंब झाल्यानंतरही तुम्हांला तोटा सहन करावा लागू शकतो. यासाठी शेतकऱ्यांनी ऊस तोडणी दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. जेणेकरून होणारे (Sugarcane Harvesting) नुकसान टाळले जाऊ शकते.

तोडणीची योग्य वेळ? (Sugarcane Harvesting Important Things)

ऊस तोडणीला आलाय याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे उसाची पाने पिवळी पडतात. ज्यामुळे उसाची पूर्ण वाढ झाल्याचे समजले जाते. उसाची पूर्ण वाढ झाल्यानंतर डोळ फुटण्यास सुरुवात होते. ही डोळ येण्यास सुरुवात झाली की तोडणीला सुरुवात करणे आवश्यक असते. तोडणीला आलेल्या उसाचे ब्रिक्स मूल्य हे 18 किंवा त्याहून अधिक असल्यास अशा उसापासून 10 ते 11 टक्के साखर उतारा मिळतो. यापेक्षा कमी ब्रिक्स मूल्य असल्यास असा ऊस अपरिपक्व समजला जातो. उसाचे ब्रिक्स मूल्य तुम्ही रेफ्रेक्टोमीटरचा वापर करून मोजू शकतात.

ऊस तोडणीची योग्य पद्धत?

सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात ऊस तोडणी (Sugarcane Harvesting) ही कोयता, कुऱ्हाड किंवा काही आधुनिक कटिंग साधने वापरून मजूर पद्धतीने केली जाते. मात्र अशावेळी तोडणीसाठी कुशल मनुष्यबळ असणे आवश्यक असते. उसाची अयोग्य पद्धतीने तोडणी केल्यास वजन आणि साखर उताऱ्यात घट होऊ शकते. उसाच्या रसाची गुणवत्ता देखील खराब होते. याशिवाय अशा उसापासून बेणे तयार केल्यास पुढील वर्षीच्या ऊस उत्पादनाला देखील फटका बसू शकतो.

  • मजूर पद्धतीने ऊस तोडणी ही प्रामुख्याने जमिनीच्या समान पृष्ठभागापासूनच करावी.
  • ऊस तोडणी यंत्रांच्या साहाय्याने केली जात असेल तर उसाचा वरील पानांचा भाग मशीन बाजूला करते आणि जमिनीपासून ते बांडीपर्यंतच्या भागाचे मशीन छोटे तुकडे करते. हे तुकडे हार्वेस्टर बॉक्समध्ये जमा होतात. सामान्यपणे 8 तासात हार्वेस्टर मशीन 2.5 ते 4 हेक्टर उसाची तोडणी करते. त्यामुळे ऊस तोडणीची ही आधुनिक पद्धत देखील प्रभावी मानली जाते.

‘या’ गोष्टींची काळजी घ्यावी

  • जमिनीच्या पृष्ठभागापासून 5 सेंमी जरी वरतून तोडणी झाल्यास तुमच्या ऊस उत्पादनात एकरी 1.5 ते 2 क्विंटलची घट नोंदवली जाऊ शकते. याशिवाय आपण लक्ष न दिल्यास 10 सेंमीपर्यंत वरतून ऊस तोडणी झाल्यास एकरी 3 ते 4 क्विंटलचा फटका बसू शकतो.
  • याशिवाय जसे ऊस तोडणी ही अगदी मुळापासून होणे गरजेचे असते. तसेच वरील बांडीच्या भागात देखील जिथपर्यंत कांडी असतात. त्या भागाची देखील योग्य काळजीपूर्वकपणे तोडणी होणे आवश्यक असते.

तोडणीनंतरची काळजी

  • तोडणीनंतर ऊसाला (Sugarcane Harvesting) जास्त वेळ शेतात ठेवू नये. यामुळे ऊस रसाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊन उत्पादन घटू शकते.
  • यामुळे साखर उतारा आणि गूळ उत्पादन यावर परिणाम होऊ शकतो.
  • काही कारणास्तव ऊस शेतात पडून राहिल्यास बांडीकडील भाग वापरून उसाच्या मोळ्या झाकून ठेवाव्यात. किंवा मग उसावर शक्य असल्यास पाण्याची फवारणी करावी. या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही आपल्या ऊस तोडणी दरम्यान होणारे नुकसान टाळू शकतात.
error: Content is protected !!