Sugarcane : ऊस दराची कोंडी फुटली! ‘या’ कारखान्याकडून सर्वाधिक 3350 रु. ऊसदर जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने (Someshwar Sugar Factory) उसदराबाबतची कोंडी फोडत मागील २०२२-२३ गाळप हंगामाकरीता प्रति मे. टन ३३५०/- रु. ऊसदर जाहीर केला असुन राज्यात एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा सोमेश्वर कारखाना राज्यातील क्रमांक एकचा कारखाना राहिला आहे. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या उच्चांकी ऊसदरावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम जगताप यांनी दिली आहे.

जमीन मोजणी, बाजारभाव, सातबारा उतारा, सरकारी योजना अशा बाबी मोबाईलवरून करण्यासाठी इथे क्लिक करून App डाउनलोड करा

श्री. जगताप पुढे म्हणाले की, सभासद व बिगर सभासद असा भेदभाव न करता ‘सोमेश्वर’ हा सर्वोच्च ऊसदर देत आहे. गेल्या ५ हंगामात सलग ३०००/- रु. हुन जास्त ऊसदर देत असुन हा दर देत असताना यापुढील काळातही कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील गेटकेनधारक व सभासद यांना एकसारखा सर्वोच्च ऊसदर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध राहिल.

सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या वर्षी तुटून गेलेल्या प्रति टन उसाला २ हजार ८५० रुपये एफआरपी दिली होती. यामध्ये संचालक मंडळाने टनाला ५० रुपयांची अधिकची भर टाकून सभासदांना २ हजार ९०० रुपये अदा केले होते. त्यामुळे आता ‘सोमेश्वर’च्या सभासदांना अजून प्रति टन ४५० रुपये मिळणार आहेत. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामात १२ लाख ५६ हजार ६६८ मे. टनाचे गाळप केले आहे. अशाच प्रकारे राज्यातील इतरही साखर कारखान्यांकडून उसाला चांगला दर मिळावा, अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!