Sugarcane Rate : ऊस दरवाढीबाबत फडणवीसांचे भाष्य; म्हणाले… सरकारचे प्रयत्न सुरु!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन तीव्र केले आहे. अलीकडेच कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत जिल्हास्तरीय पातळीवर झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने संघटनेने आक्रमक पवित्रा घेत आंदोलन सुरु ठेवले केले. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊस दरवाढीचा (Sugarcane Rate) प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. बुधवारी (ता.२२) पुणे दौऱ्यावेळी त्यांनी हे भाष्य केले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मागील वर्षाच्या हंगामातील उसाला अतिरिक्त 400 रुपये प्रति टन, तर चालू हंगामातील उसाला प्रति टन 3500 रुपये दर देण्याची मागणी लावून धरली आहे. याबाबत फडणवीस यांना पुण्यात माध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, “शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला दर मिळावा ही सरकारसोबत सर्वांचीच इच्छा आहे. मात्र व्यावहारिक अडचणींचाही विचार करावा लागतो. राज्याच्या सहकार विभागाकडून याबाबत तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.”

चक्का जाम अटळ’ (Sugarcane Rate Devendra Fadnavis Comments)

तर, बुधवारी (ता. 22) राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटना व कारखानदार प्रतिनिधींसोबत सरकारची बैठक पार पडली. मात्र कारखानदारांनी या बैठकीत मागील वर्षाच्या हंगामातील उसाला अतिरिक्त ४०० रुपये प्रति टन, तर चालू हंगामातील उसाला प्रति टन 3500 रुपये दर देण्याच्या मागणीस विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता संघटनेकडून राष्ट्रीय महामार्गावरील चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, असे राजू शेट्टी यांनी बैठकीनंतर म्हटले आहे.

गाळप संथ गतीने

राज्यातील गाळप हंगाम सुरु होऊन तीन आठवडे झाले आहेत. मात्र सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये साखर कारखान्यांचे गाळप अत्यंत संथ गतीने सुरु आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ऊस दरवाढीच्या प्रश्नासाठी आंदोलन सुरुच ठेवले आहे. परिणामी कारखान्यांकडून साखर निर्मिती अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अधिक काळ सुरु राहिले तर याचा कारखान्यांना गाळपासाठी उपलब्ध असलेला ऊस मिळवण्यासाठी मोठा फटका बसू शकतो. अशी चिंता कारखानदारांकडून व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!