Sugarcane Rate : ऊस दरवाढीसाठी कर्नाटक, उत्तरप्रदेशातही संघटना आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रानंतर आता शेजारील राज्य कर्नाटकमध्येही ऊस दरवाढीसाठी (Sugarcane Rate) शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावर्षी कर्नाटकात असलेली दुष्काळी परिस्थिती आणि उत्पादनातील घटीमुळे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाला अधिक दर (Sugarcane Rate) द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. तर तिकडे उत्तरप्रदेशातही ऊस दरवाढीचे लोण पसरल्याचे पाहायला मिळत आहे.

कर्नाटक राज्य रायथा संघटना आणि हसीरू सेना या कर्नाटकातील संघटनांनी राज्य सरकारला एक निवेदन देत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 4 हजार रुपये दर देण्याची मागणी केली आहे. चालू गाळप हंगामासाठी केंद्र सरकारने उसाला 3,150 रुपये प्रति टन एफआरपी जाहीर केला आहे. मात्र, सद्यस्थिती पाहता हा दर शेतकऱ्यांच्या उत्पादनातील घट भरून काढण्यासाठी तुंटपुजा असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन 4 हजार रुपये दर देण्याची मागणी या संघटनांनी कर्नाटक सरकारकडे केली आहे.

उत्तरप्रदेशातील शेतकरी संभ्रमात (Sugarcane Rate In India)

तर तिकडे उत्तरप्रदेशातही ऊस दरवाढीसाठी भारतीय किसान यूनियन ही संघटना आक्रमक झाली असून, या संघटनेने शेतकऱ्यांच्या उसाला प्रति क्विंटल 500 रुपये (1 टन = 10 क्विंटल) दर देण्याची मागणी केली आहे. उत्तरप्रदेशात सरकारकडून आतापर्यंत ऊस दर घोषित करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी संभ्रमात असलयाचे या संघटनेचे म्हणणे आहे.

तामिळनाडूमध्ये बैठक निष्फळ

गेल्या अनेक दिवसांपासून तामिळनाडूमध्येही मागील वर्षाच्या उसाची थकबाकी आणि शेतकऱ्यांनी कारखान्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडीवरून शेतकरी संघटना आणि कारखान्यांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दोनच दिवसांपूर्वी तामिळनाडू सरकारचे मंत्री महेश पोय्यामोझी यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटना, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याचे सांगितले जात आहे.

error: Content is protected !!