Sugarcane Rate : ‘ही’… तर शेतकऱ्यांची फसवणूक! खोत यांचा राजू शेट्टींना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : ऊस दरवाढीच्या (Sugarcane Rate) आंदोलनावरून माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. खोत यांनी शेट्टी यांच्यावर टीका केली होती. त्यास प्रतिउतर (Sugarcane Rate) देताना शेट्टी यांनी ‘मला कोण्या लुंग्या सुंग्याच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही’ असे म्हटले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा खोत यांनी शेट्टी यांच्यावर वार करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.

ऊस दरावाढीसाठी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरु ठेवले होते. मागील वर्षीच्या हंगामातील उसाला अतिरिक्त 400 रुपये प्रति टन तर चालू वर्षीच्या हंगामासाठी उसाला 3500 रुपये प्रति टन दर (Sugarcane Rate) देण्याची मागणी शेट्टी यांनी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून लावून धरली होती. या आंदोलनाबाबत दोनच दिवसांपूर्वी तोडगा निघाला असून, राजू शेट्टी यांच्यावर ठिकठिकाणी गुलालाची उधळण करण्यात आली होती. याच मुद्द्यावरून सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती.

काय म्हणाले होते खोत?

खोत राजू शेट्टी यांच्यावर टीका करताना नाव न घेता म्हटले होते की, “स्वतःच्या अंगावर गुलाल उधळून घेतला, त्या शेतकरी नेत्याने या वर्षीच्या भावापासून शेतकऱ्यांचे लक्ष विचलित केल्याचे पाप केले आहे.” सांगली जिल्ह्यातील रेठरे गावात एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी ही टीका केली होती. त्यावर शेट्टी यांनी ‘मला कोण्या लुंग्या-सुंग्याच्या प्रमाणपत्राची आवशक्यता नाही’, असा पलटवार सदाभाऊ खोत यांच्यावर केला होता. यावर खोत यांनी पुन्हा एकदा राजू शेट्टी यांना डिवचताना ‘शेतकऱ्यांची फसवणूक करत, गुलाल उधळला असल्याचे म्हटले आहे. हा गुलाल लोकसभेसाठी होता. शेतकऱ्याला तुम्ही फसवले आहे. त्यामुळे ते तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील..” असेही खोत म्हटले आहे.

error: Content is protected !!