हॅलो कृषी ऑनलाईन : राज्याच्या ऊस (Sugarcane) गाळप हंगामास यावर्षी आडकाठ्यांचे ग्रहण लागल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानीच्या आंदोलनानंतर ऊसतोड कामगारांनी आपल्या मजुरीत वाढ करावी. या मागणीसाठी ‘कोयता बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आता देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या मागणीवर तोडगा निघाला आहे. राज्य साखर कारखाना संघांकडून ऊसतोड (Sugarcane) कामगारांना चालू हंगामासाठी 366 रूपये प्रति टन मजुरी देण्यास सहमती देण्यात आली आहे.
राज्यातील ऊसतोड कामगारांच्या लढ्याला यश आले असून, त्यांना आता प्रति टन ऊस (Sugarcane) तोडीसाठी कारखान्यांकडून 366 रूपये मिळणार आहे. यापूर्वी ऊस तोडणीसाठी (Sugarcane) प्रति टन 273 रुपये 10 पैसे दिले जात होते. त्यात 50 टक्क्यांनी वाढ करत ऊस तोडणीसाठी प्रति टन 410 रुपये मजुरी देण्याची मागणी ऊसतोड कामगार संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्य सहकारी कारखाना संघाच्या झालेल्या पुण्यातील बैठकीत 366 रूपये प्रति टन मजुरी देण्याच्या सहमतीनुसार तोडगा काढण्यात आला आहे. अर्थात आता ऊसतोड कामगारांच्या मजुरीत प्रति टन 92 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळाला आहे.
आडकाठीचे ग्रहण टळले (Sugarcane Workers Demands Agree)
दरम्यान यावर्षी ऊस उत्पादनात (Sugarcane) आधीच घट होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हंगाम काहीसा लवकर आटोपला जाणार असे साखर उद्योगातून सांगितले जात आहे. दरम्यान, हंगामाच्या सुरुवातीपासूनच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपले आंदोलन सुरु ठेवले होते. परिणामी यावर्षीच्या गाळप हंगामाला मोठा फटका बसला. त्यातच आता ऊस तोड कामगारांनी कामबंद आंदोलन इशारा दिला होता. त्यामुळे साखर कारखान्यांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता ऊसतोड कामगारांच्या मजुरी संदर्भात तोडगा निघाल्याने आडकाठीचे ग्रहण काहीसे टळले असल्याचे बोलले जात आहे.