Sulfur Fertilizer : पिकांसाठी सल्फर का महत्वाचे आहे? वाचा.. सल्फरच्या वापराचे फायदे?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : राज्यातील शेतकरी शेती करताना आपल्या पिकांना विविध प्रकारची रासायनिक खते (Sulfur Fertilizer) वापरत असतात. या सर्वांमध्ये युरिया हे खत सर्वात खपाचे खत म्हणून ओळखले जाते. अलीकडेच केंद्र सरकारने शेतीसाठी सल्फर कोटेड युरियाचा वापर करण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र आता पिकांसाठी सुलफर इतके महत्वाचे का आहे? सल्फरच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नेमके काय नुकसान होऊ शकते? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत असतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण पिकांसाठी सल्फर (Sulfur Fertilizer) नेमके कसे महत्वाचे आहे? याबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत घसरण (Sulfur Fertilizer Benefits For Crops)

कृषी संशोधकांच्या एका अहवालानुसार, पिकांना किंवा झाडांना सल्फरची (Sulfur Fertilizer) कमतरता जाणवल्यास त्यांची वाढ खुंटते तसेच उत्पादनात घट दिसून येते. सल्फरच्या कमतरतेमुळे तेलबिया पिकांच्या गुणवत्तेमध्ये आणि उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत घसरण होते. सल्फरची कमतरता शेती करताना मोठी समस्या असते. मात्र, शेतीमध्ये पिके घेताना शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येत नाही.

तेलबिया पिकांसाठी महत्वाचे

भारतातील जवळपास 41 टक्क्यांहून अधिक जमिनीत सल्फरची कमतरता (Sulfur Fertilizer) आढळून येते. भारतीय तेलबिया पिकांमध्ये सोयाबीन, मोहरी, भुईमूग, तीळ हे प्रमुख तेलबिया पिके आहेत. या पिकांसाठी संतुलित खतांचा वापर आवश्यक आहे. या खतांमध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, सल्फर, जस्त आणि बोरॉन ही खते आवश्यक असतात. यात तेलबिया पिकांच्या उत्पादनासाठी सल्फर हे खूप महत्वाचे खत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तेलबिया पिके घेताना आपल्या जमिनीमध्ये सल्फरची कमतरता आढळून आल्यास त्याचा पिकांसाठी नक्की वापर करावा.

हरितलवकांच्या वाढीस मदत होते

सल्फर हा पिकांना हरितलवकांच्या चांगल्या वाढीस मदत करतो. सल्फर हे खत अमीनो ऍसिड, सिस्टीन, सिस्टिन आणि मेथिओनिन आणि प्रथिने संश्लेषणासाठी पिकांसाठी आवश्यक असते. मोहरी पिकाच्या विशिष्ट वासावर त्याचा परिणाम होतो. तेलबिया पिकांच्या पोषणामध्ये सल्फरचे (Sulfur Fertilizer) विशेष महत्त्व असून, पिकांच्या वाढीच्या अवस्थेत पिकांच्या बिया टपोऱ्या होण्याच्या अवस्थेत अर्थात तेल तयार होण्याच्या प्रक्रियेत सल्फर हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे तेलबिया पिकांमध्ये तेलकट पदार्थाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

पिकांना सल्फर कधी द्यावे?

पिकांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सल्फर फायदेशीर आहे. त्यामुळे सिंचनाच्या वेळी तेलबिया पिकांना 5 किलो प्रति बिघा या प्रमाणात सल्फर वापरावे. बेंटोनाइट सल्फरचा वापर फायदेशीर आहे. याशिवाय 8 ते 10 किलो सल्फरची धूळ प्रति एकर फवारली जाऊ शकते किंवा ओले किंवा विरघळणारे सल्फरचे द्रावण तीन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारले जाऊ शकते. सुरवंटाचा प्रादुर्भाव आढळल्यास सल्फरची फवारणी करताना ब्युव्हेरिया बेसियाना 400 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

error: Content is protected !!