Summer Crops Sowing : देशातील उन्हाळी पिकांच्या पेरणीत 7.3 टक्के वाढ; पहा… आकडेवारी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील अनेक भागांमध्ये सध्या रब्बी पिकांच्या काढणीचा (Summer Crops Sowing) अंतिम टप्पा सुरु आहे. अशातच आता अनेक भागांमध्ये यावर्षी उन्हाळी पिकांच्या पेरणीत 7.3 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 39.44 लाख हेक्टरवर उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत झालेल्या उन्हाळी पिकांच्या लागवडीपेक्षा 7.3 टक्के अधिक आहे. यामध्ये धान, मका, भुईमूग यांच्या लागवडीत वाढ झाली आहे. तर सूर्यफूल, बाजरी, रागी आणि अन्य उन्हाळी पिकांच्या (Summer Crops Sowing) लागवडीत मागील वर्षीपेक्षा काहीशी घट नोंदवली गेली आहे.

बाजरी लागवडीत 23 टक्के घट (Summer Crops Sowing 7.3 Percent Increase)

केंद्र सरकारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, उन्हाळी धान (Summer Crops) लागवडीत (Summer Crops Sowing) 8 टक्क्यांनी वाढ होऊन, ते 27.08 लाख हेक्टरवर नोंदवले गेले आहे. भरडधान्याच्या लागवडीत 9.1 टक्के वाढ होऊन ते 4.19 लाख हेक्टरवर नोंदवले गेले आहे. भरडधान्यामध्ये मका लागवड 24.2 टक्क्यांनी वाढ होऊन, ते 2.99 लाख हेक्टरवर नोंदवली गेली आहे. तर ज्वारी लागवड ही मागील वर्षीच्या 0.2 लाख हेक्टरपेक्षा दुप्पट झाली आहे. तर बाजरीच्या लागवडीत 23 टक्के घट होऊन 0.97 लाख हेक्टरवर नोंदवली गेली आहे. याशिवाय उन्हाळाच्या डाळवर्गीय पिकांच्या लागवडीत 0.5 टक्के वाढ होऊन, 3.23 लाख हेक्टरवर नोंदवली गेली आहे.

तेलबियांच्या लागवडीत 7.3 टक्के घट

मुगाच्या लागवडीत 0.6 टक्के घट होऊन, ती 2 लाख हेक्टरवर नोंदवली गेली आहे. उडीद लागवडीत 1 टक्के वाढ होऊन, ती 1.11 लाख हेक्टरवर नोंदवली गेली आहे. उन्हाळी तेलबिया लागवड प्रामुख्याने मध्यप्रदेश, बिहार, ओडिसा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्यांमध्ये अधिक होते. यावर्षी आतापर्यंत तेलबिया पिकांच्या लागवडीत 7.3 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. देशभरात 4.94 लाख हेक्टरवर उन्हाळी तेलबिया लागवड झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने भुईमूग लागवड 2.7 लाख हेक्टर, तीळ 1.85 लाख हेक्टरचा समावेश आहे. सूर्यफूल लागवड 15 टक्के वाढ होऊन, 19,000 हेक्टरवर झाली आहे.

error: Content is protected !!