Summer Onion Planting : राज्यात उन्हाळ कांदा लागवड 40 टक्के घटली; पहा.. जिल्ह्यानिहाय लागवड!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : यावर्षी राज्यातील उन्हाळ कांद्याच्या लागवडीत (Summer Onion Planting) मोठी घट झाली आहे. प्रमुख लागवड क्षेत्र असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यांमध्ये उन्हाळ कांद्याच्या लागवडीत एकूण 40 टक्क्यांनी घट नोंदवली गेली आहे. सर्वसाधारणपणे राज्यात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत उन्हाळ कांद्याची लागवड (Summer Onion Planting) केली जाते. मात्र, यावर्षी पावसाअभावी लागवड क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

लागवड क्षेत्रात मोठी घट (Summer Onion Planting In Maharashtra)

कृषी विभागाच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यांमध्ये मागील वर्षीच्या हंगामात एकूण 2.50 लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड झाली होती. यात एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 2.21 लाख हेक्टर लागवड तर 53 लाख टन उत्पादन झाले होते. मात्र यावर्षी एल-निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस झाल्याने ५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये 1.50 लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड झाली आहे. यात एकट्या नाशिक जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 1.26 लाख हेक्टरवर उन्हाळ कांदा लागवड झाली आहे.

जिल्हानिहाय लागवड आकडेवारी

यावर्षी धुळे जिल्ह्यात 14,326 हेक्टर उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. जी मागील वर्षी 16,000 हेक्टरवर नोंदवली गेली होती. जळगाव जिल्ह्यात यावर्षी 6,841 हेक्टरवर उन्हाळा कांदा लागवड झाली आहे. जी मागील वर्षी 9,481 हेक्टरवर नोंदवली गेली होती. नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी मात्र यावर्षी उन्हाळ कांद्याच्या लागवडीत वाढ दिसून आली असून, जिल्ह्यात यंदा 2,826 हेक्टरवर उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. जी मागील वर्षी 2,108 हेक्टरवर नोंदवली गेली होती. दरम्यान, उन्हाळ कांद्याच्या लागवडीत घट झाल्याने, उत्पादन देखील 35 लाख टनांपर्यंत घटण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ कांद्याला अधिक दर मिळण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

साठवण क्षमता अधिक

उन्हाळ कांदा खासकरून साठवून ठेवण्यासाठी उत्पादित केला जातो. बाजारात कांद्याची उपलब्धता कमी असताना अधिक दर मिळवण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी चाळ्यांमध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा साठवून ठेवतात. मे ते ऑक्टोबर या कालावधीत देशात कांद्याचे उत्पादन होत नाही. त्यामुळे या कांद्याला दरही चांगला मिळतो. सामान्यतः ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत शेतकऱ्यांना यातून उत्पन्न मिळते.

error: Content is protected !!