Supari Sanshodhan Kendra : सुपारी पिकाला भौगोलिक मानांकन मिळवून देणार; कृषिमंत्री मुंडेंची ग्वाही!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात सुपारीचे (Supari Sanshodhan Kendra) उत्पादन घेतले जाते. आपल्या देशामध्ये सुपारीला केवळ खाण्यासाठीच नव्हे तर पुजा-उपासना यासाठी धार्मिकदृष्ट्या देखील विशेष महत्व आहे. ज्यामुळे तिला बाजारात नेहमीच मागणी असते. याच पार्श्वभूमीवर सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे. यासाठी राज्य सरकारकडून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र (Supari Sanshodhan Kendra) उभारले जात आहे. या केंद्राचे रविवारी (ता.11) राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आहे.

भौगोलिक मानांकन मिळवून देणार (Supari Sanshodhan Kendra In Diveagar)

दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत हे केंद्र 2 हेक्टर क्षेत्रावर उभारले जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून एकूण 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राला (Supari Sanshodhan Kendra) पर्याय म्हणून दिवेआगर येथे हे विस्तारित संशोधन केंद्र उभारले जात आहे. या केंद्राच्या उदघाटनप्रसंगी श्रीवर्धनच्या सुपारीला तसेच रोहाच्या वाल यांना भौगोलिक मानांकन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले आहे. यावेळी खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे उपस्थित होते.

सुपारी संशोधनास बळकटी मिळणार

श्रीवर्धनसोबतच आता या दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राच्या (Supari Sanshodhan Kendra) माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच अधिक दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करण्यास मदत होणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना सुपारी पिकाचे अधिक उत्पादन घेण्यास फायदा होणार आहे. तसेच दिवे आगार व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम या केंद्रामार्फत केले जाणार आहे. इतकेच नाही तर हे विकसित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे अनेक उपक्रम देखील राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुपारी उत्पादकांना विशेष फायदा होणार आहे.

error: Content is protected !!