Super Napier Grass : ‘सुपर नेपियर’ चाऱ्याची लागवड करा; वर्षभर मिळेल मुबलक चारा!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय (Super Napier Grass) मोठ्या प्रमाणावर केला जातो. पशुपालनामध्ये सगळ्यात जास्त चाऱ्याची आवश्यकता असते. कारण पशुपालकांचा सगळ्यात जास्त खर्च हा जनावरांच्या चारा व्यवस्थापनावर होतो. जनावरांना चाऱ्याची उपलब्धता व्हावी, यासाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारच्या चाराची लागवड करतात. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या असते की त्यांचा पशुपालनाचा आवाका मोठा असतो. परंतु त्यामानाने त्यांच्याकडे उपलब्ध चारा लागवडीसाठीचे क्षेत्र कमी असते व असे पशुपालक हे चारा विकत घेऊन जनावरांची आहाराची गरज भागवतात. याच पार्श्वभूमीवर आज आपण सुपर नेपियर चाऱ्याच्या (Super Napier Grass) लागवडीबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

सुपर नेपियर गवत (Super Napier Grass For Dairy Farmers)

सुपर नेपियर गवत (Super Napier Grass) हे मूळचे थायलंड या देशातील असून, आपल्याकडे देखील मोठ्या प्रमाणात या गवताची लागवड केली जात आहे. पशुपालकामध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्यामुळे, सुपर नेपिअर लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणे शक्‍य आहे. काही ठिकाणी जवळ-जवळ सात ते आठ एकर जमिनीत सुपर नेपियर लागवडीच्या माध्यमातून शेतकरी लाखो रुपये प्रति महिन्याला कमवत आहेत. विशेष म्हणजे कमी पाण्यात येणारे हे चारा पीक असून, दुष्काळग्रस्त पट्ट्यात देखील याची लागवड केली जाऊ शकते.

वर्षभर मिळतो मुबलक चारा

पशुखाद्य म्हणून याचा खूप उपयोग होतो. सुपर नेपियर गवताचे उत्पादन हे वर्षभर सुरु राहत असल्यामुळे डेअरी उत्पादक शेतकऱ्यांना जनावरांसाठी हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होतो. सुपर नेपियर गवत एकदा लागवड केल्यानंतर सात ते आठ वर्ष यापासून उत्पादन मिळत राहते. यामध्ये क्रमाक्रमाने त्याची कापणी केली जाते व दुसर्‍या बाजूने शेतात एक कलम टाकल्यानंतर दुसरे कलम तयार होत असते. सुपर नेपियर गवत 15 फूट उंच वाढते व यापासून चांगल्या प्रतीचा हिरवा आणि सुका चारा देखील मिळतो.सुपर नेपियर गवताला खर्च कमी असून मात्र त्या तुलनेत उत्पादन जास्त मिळते.

error: Content is protected !!