Surati Goat: भरपूर आणि दर्जेदार दूध उत्पादन देणाऱ्या ‘सुरती शेळीची’ जाणून घ्या वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: सुरती (Surati Goat) ही भारतातील सर्वोत्कृष्ट शेळ्यापैकी एक आहे. मांस आणि दूध अशा दुहेरी फायद्यासाठी (Dual Purpose Goat Breeds) वापरण्यात येणार्‍या शेळीच्या जातीमध्ये (Goat Breeds) सुरती शेळीला (Surati Goat) विशेष महत्व आहे. जाणून घेऊ या शेळीच्या प्रजातीबद्दल सविस्तर माहिती.

मूळ स्थान

खानदेशी (Khandeshi Goat) आणि निमारी (Nimari Goat) या नावाने सुद्धा प्रसिद्ध असणाऱ्या शेळीच्या या जातीचे मूळ स्थान गुजरात (Gujrat Goat Breed) राज्यामधील सुरत हे आहे. बंदिस्त व्यवस्थापनासाठी ही शेळी (Goat) उत्तम समजली जाते.  

शरीर रचना

सुरती शेळ्या (Surati Goat)रंगाने पांढऱ्या असून, कान लांबट आणि रूंद असतात. शिंगाची लांबी साधारणपणे 3 ते 23 सेंटिमीटर पर्यंत असते. नर आणि मादी दोन्ही जातीत शिंगे आढळून येतात. सुरती ही आकाराने काहीशी मोठी असलेली शेळी आहे, त्यातही या शेळ्यांची मादी नरापेक्षा आकाराने मोठी असते. या शेळ्यांची कास चांगली विकसित झाली असते. तर स्तन आकाराने मोठे असतात. बोकडाचे वजन 32 किलो तर शेळीचे वजन 30 किलोपर्यंत भरते.

प्रजनन आणि दूध उत्पादन

सुरती शेळ्यांचे (Surati Goat) पहिल्यांदा गाभण राहण्याचे वय हे 13 ते 16  महिने दरम्यान असते. या शेळ्या वर्षातून दोनदा प्रजनन करू शकते यामध्ये जुळ्या किंवा तिळ्या करडूंना जन्म देतात.

ही शेळी दिवसाला 2 ते 2.5 लिटरपर्यंत दूध देते. या शेळीचा दूध देण्याचा कालावधी साधारण 7 ते 9 महिने असते. एका वेतातील दूध उत्पादन साधारणपणे 120 ते 150 लिटर इतके असते.

इतर माहिती

सुरती शेळ्या (Surati Goat) भारतामध्ये दुधासाठी खूप प्रसिध्द जात आहे. या जातीच्या शेळ्या जास्त प्रमाणात आणि चांगल्या प्रतिचे दूध देतात त्यामुळे चांगला फायदा होतो. भारतातील इतर जातीच्या तुलनेत या शेळीच्या कासेचा आकार मोठा असल्याने त्यांना कुरणांच्या क्षेत्रात दूरवर चरायला नेण्यावर निर्बंध येतात. म्हणून या जातीच्या शेळीला स्टॉल फीडिंगसाठी (Stall Feeding) वापरली जाते.

error: Content is protected !!