‘नाफेड’ची हरभरा खरेदी बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि, मुंबई (नाफेड) जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी हरभरा खरेदी बंद केल्याच्या निषेधार्थ काल शुक्रवारी (ता.२१) या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी आंदोलन केलं आहे. यामुळे शेतकरी संघटनेच्या अधिकाऱ्यांना दालनात कोंडण्यात आले. शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी करावा, नाहीतर तीव्रतेचे आंदोलन करण्यात येईल. खराब झालेला हरभर त्यांनी नाफेडच्या दाराबाहेर टाकून दिला.

नाफेडच्या हरभरा खरेदीचे टार्गेट पूर्ण झालं. यामुळे नाफेडने शेतकऱ्यांकडून हरभरा घेणं बंद केलं आहे. यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचा साठा तसाच राहिल्याने, आता या हरभऱ्याचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाफेडच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

नाफेडमध्ये २२ आणि २३ मार्च २०२३ या वर्षात हरभरा खरेदीला प्रारंभ केला होता. तेव्हा ५ ते ६ दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी हरभरा विक्रीसाठी येऊ शकले नाही. अशातच नाफेडने खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. अमरावती जिल्ह्यात ७५ टक्के हरभरा माल घरात पडून आहे. नाफेडने खरेदीला बंदी घातल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी यामुळे आंदोलन केलं. त्यानंतर त्यांना दालनात कोंडण्यात आलं. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. शेतकरी, आंदोलकांच्या मागण्या पूर्ण केल्या जातील अशी ग्वाही देण्यात आली. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमित अढाऊ यांनी नाफेडला विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर नाफेडला देता आले नाही.

काय म्हणाले अमित अढाऊ?

जिल्ह्यात अद्यापही ७५ % शेतकऱ्यांच्या घरी हरभरा तसाच पडून आहे. अशातच चणा खरेदीचे टार्गेट कसे पूर्ण झाले? हा प्रश्न अमित यांनी नाफेडला विचारला या प्रश्नाचे उत्तर अधिकारी देऊ शकले नाहीत. शेतकऱ्यांप्रती शासन-प्रशासनाची अनास्था झाली आहे. त्यामुळे चिडून अधिकाऱ्यांना दालनाच्या बाहेर पडू दिले नाही. असं अमित अढाऊ म्हणाले आहेत.

error: Content is protected !!