Swaraj Gyrovator SLX Rotavator : स्वराजचा मजबूत रोटाव्हेटर; सर्व प्रकारच्या मातीमध्ये करतो दमदार काम!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक अवजारांची (Swaraj Gyrovator SLX Rotavator) गरज पडते. यामध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये पेरणी (Sowing) करेपर्यंत अनेक प्रकारची मशागतीची कामे करावी लागतात. यात वेगवेगळी अवजारे आपली वेगवेगळी भूमिका निभावत असतात. यातीलच एक म्हणजे रोटाव्हेटर (Rotavator) होय. रोटाव्हेटर शेतकऱ्यांना कमी कालावधीत पेरणीसाठी जमीन तयार करून देते. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा रोटाव्हेटर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्वराज (Swaraj) कंपनीचा ‘जायरोव्हेटर रोटाव्हेटर’ तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. आज आपण स्वराज कंपनीच्या ‘जायरोव्हेटर रोटाव्हेटर’बद्दल (Swaraj Gyrovator SLX Rotavator) अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

स्वराजच्या ‘जायरोव्हेटर रोटाव्हेटर’बद्दल (Swaraj Gyrovator SLX Rotavator For Farmers)

स्वराज कंपनीचा ‘जायरोव्हेटर रोटाव्हेटर’ (Swaraj Gyrovator SLX Rotavator) हा सर्व प्रकारच्या मातीमध्ये काम करण्यास सक्षम आहे. हा रोटाव्हेटर शेतकऱ्यांसाठी 36, 42, 48 आणि 60 पात्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘जायरोव्हेटर रोटाव्हेटर’साठी शेतकऱ्यांकडे 45 ते 60 एचपी पॉवरचा ट्रॅक्टर असणे आवश्यक असते. ‘जायरोव्हेटर रोटाव्हेटर’ला गिअर ड्राइव्ह ट्रांसमिशन देण्यात आले आहे. कंपनीचा हा रोटाव्हेटर फोर स्पीड गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे. स्वराज कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला 1.50 मीटर, 1.75 मीटर, 2.0 मीटर आणि 2.5 मीटरमध्ये तयार केले आहे. विविध प्रकारच्या उपयोगासाठी कंपनीने आपल्या या रोटाव्हेटरला मल्टिपल डेप्थ ऍडजस्टर दिला आहे.

काय आहेत फीचर्स?

स्वराज कंपनीचा ‘जायरोव्हेटर रोटाव्हेटर’ अगोदरच्या पिकांच्या शेतातील सर्व अवशेष नष्ट करतो. याशिवाय कमी वेळात जमीन तयार करून पेरणीसाठी उपलब्ध होते. स्वराज कंपनीचा हा रोटाव्हेटर सर्व प्रकारच्या मातीमध्ये वापरला जाऊ शकतो. याशिवाय चटकन वळण्यासाठी या रोटाव्हेटरला सहजपणे वळवण्यासाठी मिनिमम टर्निंग रेडिअस देण्यात आला आहे. स्वराज कंपनीचा हा रोटाव्हेटर बॉक्स कव्हरसह उपलब्ध आहे. ज्यामुळे शेतीमध्ये काम करताना ट्रॅक्टरचा गिअरबॉक्स सुरक्षित राहण्यास मदत होते.

किती आहे किंमत?

स्वराज कंपनीने आपल्या या ‘जायरोव्हेटर रोटाव्हेटर’ची किंमत 85 हजार ते 1 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. याशिवाय कंपनीने आपल्या या ‘जायरोव्हेटर एसएलएक्स रोटाव्हेटरला एक वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.

error: Content is protected !!