Swaraj Tractor : शेतकऱ्यांसाठी स्वराज कंपनीचा दणगट ट्रॅक्टर; वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांमध्ये शेतीमध्ये ट्रॅक्टरचा (Swaraj Tractor) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विविध ट्रॅक्टर निर्मात कंपन्यांनी आपल्या ट्रॅक्टरची शेतकऱ्यांच्या गरजेनुसार निर्मिती केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या बाजारात हव्या त्या रेंजचे ट्रॅक्टर माफक दरात उपलब्ध होत आहे. तुम्हीही तुमच्या शेतीसाठी एखादा दणगट ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण स्वराज कंपनीच्या “स्वराज्य 963 FE 4WD” या ट्रॅक्टरबद्दल (Swaraj Tractor) सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

‘स्वराज 963 FE 4WD’ ट्रॅक्टरबद्दल (Swaraj Tractor For Farmers)

स्वराज कंपनीने ‘स्वराज 963 FE 4WD’ या ट्रॅक्टरला 3478 सीसी क्षमता असलेले 3 सिलेंडर वॉटर कूल्ड इंजिन दिले आहे. हे इंजिन 2100 आरपीएमसह 60 HP पॉवरची निर्मिती करते. याशिवाय कंपनीकडून या ट्रॅक्टरच्या इंजिनला 3478 सीसीची क्षमता देण्यात आली आहे. स्वराज कंपनीचा हा ट्रॅक्टर (Swaraj Tractor) ड्राय टाइप एअर फिल्टरमध्ये येतो. ज्याची कमाल पीटीओ पॉवर 53.6 एचपी इतकी आहे. स्वराज कंपनीने हा 963 FE 4WD ट्रॅक्टर 2200 किलो इतक्या लोड क्षमतेसह उपलब्ध केला असून, त्याचे वजन 3015 किलोग्रॅम इतके आहे. हा स्वराज ट्रॅक्टर 2245 एमएम व्हीलबेससह 3735 एमएम लांबी आणि 1930 एमएम रुंदीमध्ये कंपनीकडून तयार करण्यात आला आहे. याशिवाय या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स कंपनीने 370 एमएम इतका ठेवला आहे.

“स्वराज 963 FE 4WD’ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

  • डिफरेंशियल सिलेंडर स्टिअरिंगसह पॉवर स्टीयरिंग.
  • 12 फॉरवर्ड + 2 रिव्हर्स गीअर्ससह गीअरबॉक्स.
  • यांत्रिकरित्या कार्यरत डबल क्लच (स्वतंत्र पीटीओ) क्लच आणि सिंक्रोमेश प्रकारचे ट्रान्समिशन.
  • कंपनीने या ट्रॅक्टरला 31.70 किमी प्रतितास फॉरवर्ड स्पीड आणि 10.6 किमी प्रतितास रिव्हर्स स्पीड दिला आहे.
  • ट्रॅक्टरमध्ये ऑइल इमर्स्ड टाईप डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.
  • कंपनीचा हा ट्रॅक्टर मल्टी स्पीड आणि रिव्हर्स पीटीओ प्रकारातील पॉवर टेक ऑफसह येतो. जो 540 आरपीएम पावर जनरेट करतो.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने 9.5X24 पुढील टायर तर 16.9X28 आकाराचे मागील टायर दिलेले आहे.

किंमत किती?

स्वराज 963 FE 4WD या ट्रॅक्टरची किंमत कंपनीने भारतीय शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट लक्षात घेऊन निश्चित केली आहे. कंपनीने देश पातळीवर सर्व ठिकाणी एक्स-शोरूम किंमत ही 10.80 लाख ते 11.25 लाख रुपये इतकी ठेवली आहे. ज्यात देशातील वेगवेगळ्या ठिकाणी ऑन रोड प्राईसमध्ये बदल होऊ शकतो. स्वराज 963 FE 4WD ट्रॅक्टर हा अधिक बलवान असून, कंपनीने अत्यंत माफक किमतीमध्ये तो शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. कंपनीने या ट्रॅक्टरसाठी 2 वर्षांची वॉरंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!