Swaraj Tractors : स्वराजचा शेतकऱ्यांसाठी स्वस्तात मस्त, दणगट ट्रॅक्टर; वाचा किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : भारतीय शेतकऱ्यांमध्ये स्वराज ही आघाडीची ट्रॅक्टर (Swaraj Tractors) निर्माता कंपनी विशेष प्रसिद्ध आहे. स्वराजचा ट्रॅक्टर म्हटला की अनेक शेतकरी डोळे झाकून विश्वास ठेवतात. त्यामुळे आता तुम्हीही कधी स्वराज ट्रॅक्टरच्या दमदारपणा आणि शक्तिशाली पणाबद्दल मित्रांकडून किंवा अन्य कोणाकडून ऐकले असेल. आणि स्वराज या कंपनीचा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करता असाल तर स्वराज कंपनीचा ‘स्वराज 735 एफई ई’ हा दणगट ट्रॅक्टर तुमच्यासाठी परफेक्ट अतिशय योग्य ठरू शकतो. आज आपण स्वराज कंपनीच्या ‘स्वराज 735 एफई ई’ या ट्रॅक्टरबद्दल (Swaraj Tractors) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

‘स्वराज 735 एफई ई’ ट्रॅक्टरबद्दल माहिती (Swaraj Tractors For Farmers)

स्वराज कंपनीने ‘स्वराज 735 एफई ई’ हा आपला ट्रॅक्टर (Swaraj Tractors) 2734 सीसी क्षमतेसह 3 सिलेंडरमध्ये निर्माण केला आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने वॉटर कुलिंग सिस्टिम दिलेली आहे. हा ट्रॅक्टर 35 एचपीचा असून, तो कमीत कमी 30.1 एचपी पीटीओ पॉवर निर्मिती करतो. याशिवाय स्वराज कंपनीचा हा बलाढ्य ट्रॅक्टर 1800 आरपीएमची निर्मिती करतो. कंपनीने आपल्या या ‘स्वराज 735 एफई ई’ ट्रॅक्टरला सर्वोत्तम गुणवत्तेचा एयर फिल्टर दिलेला आहे. जो इंजिनला धूळ माती यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतो. स्वराज कंपनीने आपल्या ‘स्वराज 735 एफई ई’ या ट्रॅक्टरला 1000 किलोग्रॅम इतके वजन उचलण्याची क्षमता दिलेली आहे. ज्यामुळे तुम्ही एकावेळी या ट्रॅक्टरपासून मोठ्या क्षमतेने मालाची वाहतूक करू शकतात. या ट्रॅक्टरचे एकूण वजन 1895 किलोग्रॅम इतके आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 1950 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केलेले आहे.

स्वराज 735 एफई ई’ ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

  • ‘स्वराज 735 एफई ई’ या ट्रॅक्टरला कंपनीने मेकॅनिकल टाईप स्टीयरिंग दिलेली आहे. ज्यामुळे ड्रायव्हरला आरामदायी अनुभव मिळतो.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीने सिंगल ड्राय डिस्क टाइप क्लच दिलेला आहे.
  • कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 27 किलोमीटर प्रति तास तर मागील बाजूस 10 किलोमीटर प्रति तास इतका वेग दिलेला आहे.
  • याशिवाय कंपनीने ‘स्वराज 735 एफई ई’ या ट्रॅक्टरला ड्राय डिस्क टाइप ब्रेक्स दिलेले आहे. ज्यामुळे शेतामध्ये काम करताना ट्रॅक्टरवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
  • 735 एफई ई हा ट्रॅक्टर 2 व्हील ड्राइवसह येतो.
  • या ट्रॅक्टरला दणगट टायर देण्यात आले असून, ते सर्व प्रकारच्या वातावरणात काम करण्यात मदतगार ठरतात.

किती आहे किंमत?

स्वराज कंपनीने आपल्या ‘स्वराज 735 एफई ई’ या ट्रॅक्टरची किंमत भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन, निश्चित केली आहे. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 5.65 लाख ते 5.95 लाख इतकी ठेवली आहे. जी इतर कंपन्यांच्या ट्रॅक्टरच्या किमतींपेक्षा खूपच कमी आहे. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्स यामुळे ऑन रोड किमतीमध्ये वेगवेगळया भागात या ट्रॅक्टरच्या किमतीत तुम्हाला बदल पाहायला मिळू शकतो.

error: Content is protected !!