Swaraj Tractors : नांगरटीसाठी स्वराजचा ‘हा’ आहे शक्तिशाली ट्रॅक्टर; वाचा किंमत!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये रब्बी पिकांचे वावर (Swaraj Tractors) मोकळे होत आहे. अशातच ओली-ओली शेताची नांगरट करणे उत्तम मानले जाते. त्यामुळे जानेवारी ते मार्च या काळात शेतकरी अधिकाधिक ट्रॅक्टर खरेदी करताना आढळून येतात. त्यामुळे आता तुमच्याकडेही ट्रॅक्टर नसल्यास, तुम्ही आर्थिक जमवाजमव करून नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्वराज या नावाजलेल्या कंपनीचा ‘स्वराज 843 एक्सएम ओएसएम’ हा शक्तिशाली ट्रॅक्टर (Swaraj Tractors) तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे.

‘स्वराज 843 एक्सएम ओएसएम’ ट्रॅक्टरबद्दल (Swaraj Tractors For Farmers)

स्वराज या कंपनीचा ‘स्वराज 843 एक्सएम ओएसएम’ हा ट्रॅक्टर (Swaraj Tractors) तुम्हाला 2730 सीसी क्षमतेसह 4 सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने वॉटर कुलिंग सिस्टीम दिलेली आहे. स्वराज कंपनीचा हा ट्रॅक्टर 45 हॉर्स पावरचा असून, तो थ्री स्टेज ऑइल बाथ टाईप एयर फिल्टरमध्ये येतो. ज्यामुळे इंजिनचे संरक्षण होण्यास मदत होते. कंपनीचा हा ट्रॅक्टर कमीत कमी 38.4 एचपी पीटीओ पावर जनरेट करतो. याशिवाय या ट्रॅक्टरचे इंजिन 1900 आरपीएमची निर्मिती करते. आपल्या या बलाढ्य ट्रॅक्टरला कंपनीने 45 लीटर क्षमतेची डिझेल टाकी दिलेली आहे. आपल्या या ट्रॅक्टरला कंपनीने 1200 किलो इतके वजन उचलण्याची क्षमता दिलेली असून, त्याचे 1930 वजन किलोग्रॅम इतके आहे. कंपनीने आपल्या ट्रॅक्टरला एकूण 3370 एमएम लांबी, 1765 एमएम रुंदी आणि 2060 एमएम व्हीलबेसमध्ये तयार केलेले आहे. स्वराज कंपनीचा हा ट्रॅक्टर 410 एमएम ग्राउंड क्लीयरन्ससह तयार करण्यात आला आहे.

काय आहेत फीचर्स?

  • स्वराज कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला सिंगल ड्रॉप आर्म मेकॅनिकल/ पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे. ज्यामुळे खडबडीत रस्त्यांवर देखील चालकाला वाहन चालवताना आरामदायी अनुभव मिळतो.
  • स्वराज कंपनीने आपल्या ‘स्वराज 843 एक्सएम ओएसएम’ या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 8 आणि मागील बाजूस 2 गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे.
  • या ट्रॅक्टरला कंपनीकडून सिंगल/ड्युअल टाइप क्लच देण्यात आला आहे. जो कॉन्स्टन्ट मेश टाइप ट्रांसमिशनसह येतो.
  • कंपनीने आपल्या या शक्तिशाली ट्रॅक्टरला पुढील बाजूस 2.3 ते 29.3 किमी प्रति तास तर मागील बाजूस 2.7 ते 10.6 किलो प्रति तास इतका वेग दिलेला आहे.
  • स्वराज कंपनीने आपल्या ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड ब्रेक्स दिलेले आहे. ज्यामुळे ट्रॅक्टरवर चटकन नियंत्रण मिळवता येते.
  • हा ट्रॅक्टर प्रामुख्याने 2 व्हील ड्राइवसह उपलब्ध आहे.
  • या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 6.00 x 16 आकारात टायर देण्यात आले आहे. तर मागील बाजूस 13.6 x 28 / 12.4 x 28 आकाराचे टायर देण्यात आले आहे.

किती आहे किंमत?

स्वराज कंपनीकडून आपल्या ‘स्वराज 843 एक्सएम ओएसएम’ या ट्रॅक्टरची (Swaraj Tractors) शोरूम किंमत 6.10 लाख ते 6.40 लाख रुपये इतकी माफक ठेवण्यात आली आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्सममुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत ही वेगवेगळी राहू शकते. स्वराज कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 2000 तास किंवा मग 2 वर्ष जे अगोदर संपेल, तितक्या कालावधीसाठी वारंटी दिलेली आहे.

error: Content is protected !!