Swaraj Tractors : स्वराज कंपनीचा ‘हा’ ट्रॅक्टर कमी डिझेलमध्ये करतो अधिक काम; वाचा किंमत?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : देशातील लहान आणि मध्यम जमीन क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वराज या ट्रॅक्टर (Swaraj Tractors) निर्माता कंपनीने आपला अत्याधुनिक ट्रॅक्टर बनवलेला आहे. जो सध्या गावागावात पाहायला मिळतो. इतकेच नाही तर कमी डिझेलमध्ये तो अधिक कमी करत असल्याने, त्याने भारतीय शेतकऱ्यांमध्ये आपली एक विशेष ओळख निर्माण केली आहे. आता तुम्ही देखील एखादा असाच मध्यम स्वरूपाचा ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण स्वराज कंपनीच्या “स्वराज 724 FE 4WD” या छोट्या ट्रॅक्टरबद्दल (Swaraj Tractors) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

“स्वराज 724 FE 4WD” या ट्रॅक्टरबद्दल (Swaraj Tractors Work With Less Diesel)

स्वराज कंपनीने “स्वराज 724 FE 4WD” (Swaraj Tractors) या आपल्या छोट्या ट्रॅक्टरची निर्मिती 1823 सीसी क्षमतेसह 2 सिलेंडरमध्ये केली आहे. या ट्रॅक्टरला कंपनीने वॉटर कुलिंग इंजिनसह उपलब्ध केले आहे. जो 25 एचपी पॉवर आणि 114 एनएम टॉर्क जनरेट करतो. कंपनीचा हा ट्रॅक्टर ड्राय टाईप विथ ड्युअल एलिमेंटमध्ये येतो. ज्यामुळे इंजिनचे धूळ आणि मातीपासून संरक्षण होते. आपल्या या स्वराज ट्रॅक्टरला कंपनीने कमीत कमी पीटीओ पॉवर 21.5 एचपी इतकी दिलेली आहे. ज्यामुळे या ट्रॅक्टरचे इंजिन 1800 आरपीएमची निर्मिती करते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला अधिक क्षमतेची डिझेल टाकी देखील दिलेली आहे. मात्र, हा ट्रॅक्टर कमी इंधन अर्थात कमी डिझेलमध्ये अधिक काम करतो. असा दावा कंपनीकडून या ट्रॅक्टरबद्दल केला जातो. या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता 750 किलोग्रॅम इतकी आहे. स्वराज कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला 285 एमएम इतका ग्राउंड क्लीयरन्स दिलेला आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?

स्वराज कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला बॅलन्सड पॉवर स्टीयरिंग दिलेली आहे. ज्यामुळे चालकाला शेतात काम करताना अधिक ताकत लावण्याची गरज पडत नाही. या ट्रॅक्टरला कंपनीने पुढील बाजूस 8 आणि मागील 4 गिअरसह गिअरबॉक्स दिलेला आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर सिंगल डायाफ्राम टाइप क्लचसह येतो. शेतामध्ये काम करताना किंवा वाहतुकीदरम्यान शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळावी. यासाठी या ट्रॅक्टरला ऑइल इमर्जड मल्टी डिस्क ब्रेक्स देण्यात आला आहे. स्वराज कंपनीचा “स्वराज 724 FE 4WD” हा ट्रॅक्टर 4×4 ड्राइवमध्ये येतो. ज्यामुळे या ट्रॅक्टरच्या सर्व टायर्सना शक्ती मिळते. कंपनीने आपल्या या ट्रॅक्टरला पुढील बाजूस 6.00 x 14 आकाराचे तर मागील बाजूस 8.3 x 24 आकाराचे टायर दिलेले आहेत.

किती आहे किंमत?

स्वराज कंपनीने “स्वराज 724 FE 4WD” या आपल्या छोट्या ट्रॅक्टरची शोरूम किंमत 4.80 लाख ते 5.10 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. मात्र, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रोड टॅक्समुळे, या ट्रॅक्टरची किंमत ही देशात वेगवेगळी असू शकते. कंपनीने आपल्या या छोट्या ट्रॅक्टरला 2000 तास किंवा मग 2 वर्ष जे अगोदर संपेल. तितक्या कालावधीसाठी वारंटी प्रदान केलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही स्वराज कंपनीचा हा ट्रॅक्टर खरेदी करून आपली शेतीची कामे सोपी करू शकतात.

error: Content is protected !!