Sweccha Voice Message App for Agriculture: मोबाईल ॲपच्या मदतीने आशम्मा करते शेतातील पाण्याचे मोटर सुद्धा बंद!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा (Sweccha Voice Message App for Agriculture) वापर दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. हे तंत्रज्ञान फक्त मोठे शेतकरीच नाही तर लहान आणि मध्यम शेतकर्‍यांच्या कशा प्रकारे उपयोगाचे होईल यासाठी प्रयत्न चाललेले आहेत. असेच एक यशस्वी तंत्रज्ञान ‘स्वेच्छा’ (Sweccha) या संस्थेमार्फत विकसित केले गेले आहे. त्यांनी विकसित केलेले हे मोफत व्हॉईस मेसेज सॉफ्टवेअर ॲप (Sweccha Voice Message App for Agriculture) शेतकऱ्यांना सुरक्षित ठेवण्यास मदत करते.

तेलंगणाच्या (Telangana) दुर्गम गावातील पन्नास वर्षीय आशम्मा ही महिला शेतकरी (Woman farmer) तिच्या फोनवरून तेलुगुमध्ये ‘मोटर आपु’ म्हणजे मोटर थांबवा असा व्हॉईस मेसेज पाठवते आणि मोबाईल ॲप मधील आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI Technology) सोल्युशनद्वारे दूर बसवलेले पाण्याचे मोटर बंद होते.

आशाम्मा, तिची सासू भीमाम्मा आणि मेहुणा बसवराज दोघेही व्हॉईस कमांड मेसेजचे कार्य बघून भारावून जातात. आनंद आणि त्याचवेळी दुःख या दोन्ही भावना त्यांच्या मनात येतात. दुःखाचे कारण म्हणजे हे ॲप त्यांना अगोदर मिळाले असते तर आशम्माच्या पतीचा जीव वाचला असता.  त्यांच्या शेतात पाण्याची मोटर चालू करण्याचा प्रयत्नात विजेचा धक्का लागून जीव गेला. पण यापुढे या ॲपमुळे इतर शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागणार नाही याचा आनंद सुद्धा त्यांना होता. कारण त्यांच्यासारख्या शेतकऱ्यांकडे आता मोबाईल ॲपचा पर्याय, जो दूरस्थपणे पाण्याची मोटर सुरक्षित अंतरावर चालवू शकतो.

काय आहे ‘स्वेच्छा गोंथू’ ॲप (Sweccha Voice Message App for Agriculture)

पूर्णपणे ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर बनवलेले स्वेच्छा गोंथू (फ्री व्हॉईस) ॲप येत्या काही आठवड्यांत शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचेल. हे स्वेच्छा संस्थाद्वारे विकसित केले गेलेले ॲप आहे, जे स्वयंसेवक तंत्रज्ञ (volunteer techies) यांच्या योगदानामुळे मुक्त-स्रोत तंत्रज्ञानावर आधारित विनामूल्य वापरता येणारे सॉफ्टवेअर आहे.

40,000 हून अधिक स्वयंसेवकांनी तेलंगणातील लोकांकडून आवाजाच्या नमुन्यांचा एक जबरदस्त डेटासेट तयार केला आहे. या नमुन्यांचा उपयोग एआय मॉडेलला सर्व संभाव्य बोलीभाषांवर प्रशिक्षण देण्यासाठी आणि राज्यभरातील लोकांच्या मॉड्युलेशनसाठी करण्यात आलेले आहे असे  स्वेच्छाचे संस्थापक किरण चंद्र यांनी सांगितले.

शेतकऱ्यांसाठी सुरक्षित ॲप (Sweccha Voice Message App for Agriculture)

स्वेच्छाचे संस्थापक किरण चंद्र यांनी सांगितले की हे ऍप्लिकेशन शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक शॉकसारख्या संभाव्य धोक्यांपासून वाचवेल कारण ते सुरक्षित अंतरावरून गॅझेट ऑपरेट करू शकतात.

संस्थेने अलीकडेच स्मॉल लँग्वेज मॉडेल सुद्धा (a small ChatGPT ) जारी केले आहे जे प्रॉम्प्ट्सचा संच दिल्यास चंदामामा सारख्या बालकथांचे मंथन सुद्धा करू शकतात.

स्वयंसेवकांना त्यांच्या कुटुंबातील किमान पाच सदस्यांचे आणि मित्रांचे आवाजाचे नमुने प्रदान करून सर्व्हरवर अपलोड करण्यास सांगितले गेले होते. इतके मोठे डेटासेट तयार करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. समुदाय त्वरीत असे डेटासेट तयार करू शकतात असे स्वेच्छाचे सदस्य चैतन्य यांनी सांगितले आहे.  

यात 15 लाखाहून अधिक व्हॉइस नमुन्यांचा समावेश असलेला एक मोठा डेटासेट गोळा करण्यात आला, ज्याचा वापर AI ऍप्लिकेशनला प्रश्न चांगल्या प्रकारे समजण्यासाठी करण्यात आला.

देशातील सर्व प्रादेशिक भाषांमध्ये मॉडेलची प्रतिकृती (Sweccha Voice Message App for Agriculture) तयार करण्याचा संस्थेचा विचार आहे. समुदाय आणि मुक्त स्त्रोत वापरून मूलभूत सामाजिक समस्या सोडवू शकतो तसेच इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील याची पुनरावृत्ती करू शकतो, असे संस्थेचे सदस्य सांगतात.

दोन दिवसीय एआय डेज 2024 च्या परिषदेत या ॲपचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

error: Content is protected !!