Sweet Potato Variety : ‘श्रीभद्रा’ वाणाच्या रताळ्याची लागवड करा; सरकार देतंय घरपोच बियाणे!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : महाराष्ट्रासह भारतामध्ये रताळ्याचे उत्पादन (Sweet Potato Variety) मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यात प्रामुख्याने सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, ठाणे, रायगड, धुळे व अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये रताळ्याचे पीक घेतले जाते. मुख्यत: पांढऱ्‍या आणि लाल सालीच्या रताळाची लागवड केली जाते. रताळे हे आयुर्वेदिक पीक असून, आज आपण रताळाच्या ‘श्रीभद्रा’ वाणाबाबत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील रताळाची शेती करू इच्छित असाल तर ‘श्रीभद्रा’ हे वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. विशेष म्हणजे रताळ्याचे हे वाण (Sweet Potato Variety) राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले असून, तुम्ही ते घरबसल्या मागवू शकतात.

तीन-चार महिन्यात येते काढणीला (Sweet Potato Variety Shribhadra Seeds)

सर्वसाधारणपणे रताळ्याचे पीक सर्वच हंगामामध्ये घेतले जाऊ शकते. मात्र शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळवण्यासाठी पावसाळा आणि उन्हाळा हा हंगाम उत्तम मानण्यात आला आहे. त्यातही जून महिन्यात रताळाची लागवड केल्यास, तुमच्या पिकाला अधिक दर मिळण्याची शक्यता अधिक असते. कारण सप्टेंबर महिन्यात हरितालिकाच्या उपवासासाठी रताळे विशेष मानली जातात. ‘श्रीभद्रा’ वाणाच्या रताळाचे (Sweet Potato Variety) पीक प्रामुख्याने 90 ते 105 दिवसांमध्ये काढणीला येते. या वाणाच्या रताळ्याचा रंग प्रामुख्याने गुलाबी आणि साईज छोटी असते. असे असले तरी बाजारात या वाणाला अधिकचा दर मिळतो. त्यामुळे त्यांना त्यातून अधिकचा नफा मिळण्यास मदत होते.

35 टक्के स्वस्तात मिळतंय बियाणे

शेतकऱ्यांना वेळेत आणि खात्रीशीर बियाणे उपलब्ध व्हावे. यासाठी राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून (एनएससी) शेतकऱ्यांसाठी ‘श्रीभद्रा’ या सुधारित रताळे जातीचे बियाणे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकरी हे बियाणे ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स अर्थात ओएनडीसीवरून घरबसल्या मागवू शकतात. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना सर्व बियाणे ऑनलाईन पद्धतीने तात्काळ उपलब्ध होतात. त्यामुळे आता तुम्ही रताळ्याच्या ‘श्रीभद्रा’ वाणाचे बियाणे घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून मागवू शकतात. राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून रताळाचे बियाणे मागवल्यास शेतकऱ्यांना एकूण किमतीच्या 35 टक्के सूट मिळते. अर्थात 500 ग्रॅमचे बियाणे पॅकेट 1562 रुपयात शेतकऱ्यांना मिळते. या बियाणे पॅकेटची किंमत ही 2,415 रुपये इतकी आहे. मात्र शेतकऱ्यांना त्यावर सूट देण्यात आली आहे.

error: Content is protected !!