Agriculture News : शेतकऱ्यांनो ‘या’ पानाची शेती करून तुम्ही कमावू शकताय लाखो रुपये; जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Agriculture News : भारत हा कृषीप्रधान देश आहे, मात्र या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे सर्वाधिक आर्थिक नुकसान होते. कधी पूर, कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस मात्र, हे सर्व नुकसान बहुतांशी पारंपारिक पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचेच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा पिकाबद्दल सांगणार आहोत, ज्या पिकाची फक्त पाने विकून तुम्ही बक्कळ नफा कमवू शकता. चलातर मग जाणून घेऊया याबद्दल माहिती.

नेमके कोणते आहे पीक?

शेतकरी शेतीत अनेक वेगेवेगळी पिके घेऊन नफा कमवायचा प्रयत्न करत असतात. यामध्ये कधी शेतकऱ्यांना नफा मिळतो तर कधी तोटा देखील सहन करावा लागतो. आपण ज्या पिकाबद्दल बोलत आहोत ते तमालपत्र आहे. तमालपत्र प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आढळते. काही ठिकाणी याचा वापर मसाला म्हणून केला जातो तर काही ठिकाणी याचा वापर डेकोक्शनमध्ये केला जातो. भारतासह संपूर्ण जगामध्ये या पानाची मागणी वर्षभर असते. त्यामुळे या पानाची शेती केल्यास चांगला नफा मिळतो. त्यामुळे तुम्ही जर तमालपत्राची लागवड वेळेवर केली तर सामान्य पारंपरिक पिकांपेक्षा यामधून जास्त नफा मिळेल.

तमालपत्रांची लागवड अनेकदा खडकाळ जमिनीवर केली जाते. त्यामुळे जर तुमच्याकडे खडकाळ जमीन असेल तर तुम्ही देखील याची लागवड करू शकता. त्याच्या लागवडीसाठी, मातीचे पीएच मूल्य 6 ते 8 दरम्यान असले पाहिजे, त्याचबरोबर त्याच्या झाडांमधील योग्य अंतराची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. याची लागवड जून ते जुलै दरम्यान केली जाते. (Agriculture News)

तमालपत्राची लागवड कुठे होते?

भारतामधे सध्या उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि केरळ त्याचबरोबर ईशान्य भारतातील डोंगराळ भागात याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परदेशात देखील याची लागवड केली जाते. इटली, रशिया, फ्रान्स, बेल्जियम त्याचबरोबर अमेरिकेच्या काही भागामध्येही याची लागवड केली जाते.

आमच्या अँप बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

आम्ही शेतकऱ्यांचा विचार करून खास त्यांच्यासाठी एक अँप आणले आहे. Hello Krushi असं या अँपच नाव आहे. यामध्ये तुम्हाला कृषीसंबंधी सर्व माहिती अगदी मोफान मिळेल त्यामुळे लगेचच Hello Krushi हे अँप लगेचच प्ले स्टोअरला जाऊन इंस्टाल करा.

error: Content is protected !!