Tamarind Farming : आंबट चिंचही वाटेल गोड; कमी पाण्यात, कमी खर्चात अशी करा चिंचेची शेती!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : सध्याच्या घडीला शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात (Tamarind Farming) मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून मिळणारा नफा हा खूप अत्यल्प मिळतो. कधी-कधी तर उत्पादन खर्च भरमसाठ झाल्यास, आणि मालाला कमी दर मिळाल्यास शेतकऱ्यांना तोटा देखील सहन करावा लागतो. ज्यामुळे सध्या अनेक शेतकरी शाश्वत शेतीची वाट धरत आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील शाश्वत शेतीच्या करण्याचा विचार करत असाल तर चिंचेची शेती तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. चिंच लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना त्यानंतर कोणताही उत्पादन खर्च नसतो. तर त्यापासून वर्षानुवर्षे उत्पन्न मिळत राहते. आज आपण चिंचेच्या शेतीबद्दल (Tamarind Farming) सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

आवश्यक हवामान (Tamarind Farming Less Water And Less Cost)

सध्या राज्यातील सर्वच भागांमध्ये चिंचेचा (Tamarind Farming) काढणी हंगाम जोरात सुरु आहे. भारतामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, झारखंड, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक चिंच लागवड होते. तर काही शेतकऱ्यांकडे बांधावर देखील मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे पाहायला मिळतात. साधारणपणे चिंचेला 25 ते 30 अंश सेल्सिअस इतके तापमान आवश्यक असते. चिंच शेतीचा विशेषतः म्हणजे झाडांवर गरम हवा आणि उष्णतेचा लाटेचा परिणाम होत नाही. थंड वातावरण मात्र चिंचेच्या झाडांसाठी घातक असते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये चिंचेच्या झाडांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. चिंचेच्या शेतीसाठी प्रामुख्याने एक फूट खोल खड्डा आणि एक फूट रुंद खड्डा तयार करावा. ज्यामध्ये खाद आणि वर्मी कंपोस्ट खत टाकून चिंचेची लागवड करावी.

किती मिळते उत्पन्न?

चिंचेची लागवड कोणत्याही वातावरणात केली जाऊ शकते. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीला जून आणि जुलै महिना हा चिंच लागवडीसाठी (Tamarind Farming) प्रभावी मानला जातो. तसेच लाल, काळी, मुरमाड अशी तीनही प्रकारची माती योग्य समजली जाते. चिंचेची लागवड करण्यासाठी जमिनीचा पीएच हा 6.5 ते 7.5 इतका असावा लागतो. अर्थात एक पूर्ण क्षमतेने वाढलेले चिंचेचे झाड वर्षाला दोन ते अडीच क्विंटल चिंचेचे उत्पादन हमखास मिळवून देते. यातील बिया काढून चिंचेचा गर विक्री केला जातो. चिंचेला साधारणपणे 10 ते 12 हजार रुपये क्विंटलचा दर हमखास मिळतो. ज्यातून शेतकऱ्यांना एका झाडापासून 15 ते 20 हजारांचे उत्पादन हमखास मिळते.

काय काळजी घ्यावी?

मात्र, सखोल माहिती मिळवून चिंचेची शेती केल्यास शेतकरी अधिक उत्पादन मिळवू शकतात. यासाठी झाडांना वेळोवेळी पाणी देणे, झाडाच्या बुध्यांना मातीही भर टाकणे, याशिवाय झाडांना मुळांना शेणखत, खाद टाकणे आवश्यक असते. याशिवाय झाडांना कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी शेतामध्ये गवत नियंत्रण या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. यासोबतच चिंचेच्या झाडावरील कीड नियंत्रण करणे देखील खूप आवश्यक असते. ज्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पादन मिळण्यास मदत होते.

error: Content is protected !!