Loan Waiver : या राज्यात सरकरने केली कर्जमाफीची घोषणा, शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज माफ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन (Loan Waiver) । तेलंगणा सरकारने स्वातंत्र्यदिनी शेतकऱ्यांना 5,809.78 कोटी रुपयांची भेट दिली आहे. तेलंगणा सरकारने 9 लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज माफ केले आहे. मुख्यमंत्री के.के. चंद्रशेखर राव यांनी निवडणुकीदरम्यान दिलेले आश्वासन पूर्ण करत कर्जमाफीसाठी निधी देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रातही अशाप्रकारचा निर्णय व्हावा अशी मागणी केली जात आहे.

एक लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज माफ केले

ज्या शेतकऱ्यांनी 1 लाख रुपयांपेक्षा कमी कर्ज घेतले आहे त्यांची कर्जाच्या ओझ्यातून मुक्तता केली जाईल आणि 99,999 रुपयांपर्यंतचे कर्ज बँकांना देण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांच्या वतीने तातडीने पैसे बँकांमध्ये जमा करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सीएम केसीआरच्या सूचनेनुसार, वित्त विभागाने 9,02,843 शेतकऱ्यांना 5,809.78 कोटी रुपये जारी केले. जाहीर केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

2018 मध्ये सलग दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर, सीएम केसीआर यांनी 11 डिसेंबर 2018 पर्यंत 1 लाख रुपयांपेक्षा कमी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, देशात कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि नोटाबंदीच्या परिणामांमुळे सरकारला संसाधने उभारण्यात मोठी अडचण आली.

शेतकऱ्यांची कर्जमाफी

2 ऑगस्ट रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी 45 दिवसांत कर्जमाफी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. 50,000 रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या 7,19,488 शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारने बँकांना 1,943.64 कोटी रुपये दिले. रु. 99,999 पर्यंतच्या कर्जाच्या रकमेची पुर्तता करण्याचे नवीन आदेश जारी करण्यात आले. ताज्या निर्णयामुळे, सरकारने एकूण 16,66,899 शेतकर्‍यांना फायदा झाला आहे.

राज्यमंत्री आणि बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यांनी सीएम केसीआर यांच्या परोपकारी राजवटीत तेलंगणातील शेतकऱ्यांसाठी हे आणखी एक वरदान असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट केले की, शेतकरी-अनुकूल तेलंगणा सरकारने 99,999 रुपयांपेक्षा कमी कर्जासाठी एका दिवसात 5,809 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ केले आहे. ते म्हणाले, एवढ्या मोठ्या प्रमाणावर दोनदा कृषी कर्ज माफ करणारे तेलंगणा हे एकमेव भारतीय राज्य आहे, याचा अभिमान आहे.

error: Content is protected !!