Tata Intra V30 Pick Up : शेतकऱ्यांसाठी ‘टाटा इंट्रा वी 30 पिकअप’; देतो 14 किमी प्रति लिटर मायलेज!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतकऱ्यांना शेतीमध्ये वाहतुकीसाठी नियमितपणे ट्रॅक्टरसह पिकअप (Tata Intra V30 Pick Up) किंवा छोटा पिकअप यांची आवश्यकता भासते. त्यामुळे आता तुम्ही देखील एखादा छोटा पिकअप घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टाटा इंट्राचा वी 30 हा पिकअप तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरणार आहे. आज 70 एचपी पॉवर असलेल्या आणि 140 एनएम टॉर्क जनरेट करणारी आणि 1496 सीसी इंजिन क्षमता असलेल्या ‘टाटा इंट्रा वी 30 पिकअपबद्दल (Tata Intra V30 Pick Up) अधिक जाणून घेणार आहोत.

टाटा इंट्रा वी 30 पिकअपबद्दल (Tata Intra V30 Pick Up For Farmers)

‘टाटा इंट्रा वी 30 हा पिकअप’ (Tata Intra V30 Pick Up) हा शेतकऱ्यांसाठी 1496 सीसी क्षमतेसह उपलब्ध असून, कंपनीने त्याला 4 सिलेंडर दिलेले आहेत. या पिकअपला कंपनीने दोन इंजिन दिले असून, ते 70 एचपी पॉवरसह 140 एनएम टॉर्क जनरेट करतात. कंपनीने आपल्या या पिकअपला 80 किमी प्रति तास इतका वेग दिलेला आहे. याशिवाय पीकअपला तुम्हाला 35 लीटर क्षमतेची डिझेल टाकी पाहायला मिळते.

हा पीकअप तुम्हाला 14 किमी प्रति लिटर इतक्या शानदार मायलेजसह उपलब्ध आहे. ‘टाटा इंट्राच्या वी 30 या पिकअप’ची क्षमता ही 1300 किलो इतके वजन उचलण्याची क्षमता आहे. तसेच या पीकअपचे एकूण वजन हे 2565 किलोग्रॅम इतके आहे. कंपनीने आपल्या या पीकअपची निर्मिती 4460 एमएम लांबी, 1930 एमएम रुंदीसह 2450 एमएम व्हीलबेसमध्ये केली आहे. तसेच या पिकअपला 175 एमएम इतका ग्राऊंड क्लियरन्स देण्यात आला आहे.

टाटा इंट्राच्या वी 30 पिकअपचे फीचर्स

‘टाटा इंट्रा वी 30 हा पिकअप’ला (Tata Intra V30 Pick Up) इलेकट्रीक पॉवर स्टीयरिंग देण्यात आली आहे. कंपनीचा हा पिकअप GBS 65 , 5 Forward + 1 Reverse गियरबॉक्ससह उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या पिकअपला सिंगल प्लेट ड्राय फ्रिक्शन डायाफ्राम टाइप क्लच दिला आहे. ज्यास मॅन्युअल ट्रांसमिशन देण्यात आले आहे. कंपनीचा हा पिकअप पार्किंग ब्रेक्ससह डिस्क आणि ड्रम ब्रेकमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने आपल्या या पीकअपला सेमी एलिओप्टिकल 8 लीफ स्प्रिंग्स रियर सस्पेंशनसह तयार केले आहे. कंपनीने आपल्या या पिकअपला एकदम आरामदायी केबिन उपलब्ध करून दिली, ज्यात ड्रायव्हरसह अन्य एकजण बसू शकतो. कंपनीने आपल्या या पिकअपला 185 R14 LT फ्रंट आणि रियर टायर दिले आहेत.

किती आहे किंमत?

कंपनीने आपल्या ‘टाटा इंट्रा वी 30 हा पिकअप’ची (Tata Intra V30 Pick Up) शोरूम किंमत ही 8.11 लाख ते 8.61 लाख रुपये इतकी निर्धारित केली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये आरटीओ रजिस्ट्रेशन आणि रॉड टॅक्स वेगवेगळा असल्याने, त्याची किंमत प्रत्येक राज्यात वेगवेगळी राहू शकते. कंपनीने आपल्या या पिकअपला २ वर्ष किंवा मग 72,000 तास पूर्ण जे आधी पूर्ण होईल, इतक्या क्षमतेत वॉरंटी प्रदान केलेली आहे.

error: Content is protected !!