Temporary Shade net Technology: बिरसा कृषी विद्यापीठाने भाजीपाला पिकांसाठी विकसित केले तात्पुरते शेडनेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन: बिरसा कृषी विद्यापीठाने भाजीपाला लागवडीसाठी (Temporary Shade Net Technology) एक किफायतशीर तंत्रज्ञान विकसित केले असून या तंत्रज्ञानाचा वापर करून छोटे शेतकरी वर्षभर भाजीपाला पिकवू शकतात. हे तंत्रज्ञान आहे तात्पुरते शेडनेट (Temporary Shade Net Technology).  

“BAU” ने विकसित केलेल्या ‘तात्पुरते शेड नेट मायक्रो क्लायमॅटिक मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीला’ भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या (Ministry of Commerce and Industry, Government of India) पेटंट, डिझाइन्स आणि ट्रेडमार्क्सच्या नियंत्रकाच्या कार्यालयाकडून ट्रेडमार्क मिळाला आहे असे विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे वर्षभर दर्जेदार भाज्यांचे (Vegetable Cultivation) फायदेशीर आणि शाश्वत उत्पादन (Sustainable production) घेता येईल असे सुद्धा त्यांनी सांगितले.

हे तंत्रज्ञान (Temporary Shade Net Technology) कृषी संरचना आणि पर्यावरण व्यवस्थापन (PEASEM) मध्ये प्लास्टिक अभियांत्रिकीवरील अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्या BAU केंद्रातील प्रमुख अन्वेषक प्रमोद राय यांनी विकसित केले आहे.

भाजीपाल्याची उत्पादकता आणि गुणवत्तेवर अनुवांशिकता, पीक व्यवस्थापन आणि सूक्ष्म हवामान व्यवस्थापनाचा परिणाम होतो. लागवड केलेल्या पिकांसाठी तापमान (माती आणि हवा), प्रकाश (तीव्रता आणि गुणवत्ता), सापेक्ष आर्द्रता, कार्बन डायऑक्साइड इत्यादीसारखे महत्त्वाचे सूक्ष्म हवामान मापदंड संरक्षित लागवड तंत्रज्ञान वापरून व्यवस्थापित केले जातात.

संरक्षित लागवडीच्या (Protective Cultivation) संरचनेची निवड ही त्या संरचनेतून मिळणारा नफा, त्याचा टिकाऊपणा, निश्चित खर्च, ऑपरेशन खर्च आणि लागवड केलेल्या भाज्यांच्या कार्बन फूटप्रिंट (Carbon Footprint) यावर परिणाम करते.

उदाहरणार्थ उन्हाळ्याच्या महिन्यांत (मार्च-मे) टोमॅटो आणि सिमला मिरचीची लागवड केल्यास  माती आणि हवेचे उच्च तापमान आणि प्रकाशाच्या तीव्रतेमुळे समस्या निर्माण होतात. त्यामुळे  पिकांची उत्पादकता आणि गुणवत्तेवर परिणाम होते. गुणवत्तेच्या बाबतीत मुख्य चिंता ही सनबर्न (Sunburn) आहे ज्यामुळे 50% पेक्षा जास्त फळे प्रभावित होतात.

टोमॅटो (Tomato) आणि शिमला मिरचीची (Capsicum) कायमस्वरूपी शेड नेटमध्ये (हिरव्या, 35-50%) उन्हाळ्याच्या महिन्यांत लागवड करून ही समस्या कमी केली जाऊ शकते. परंतु वर्षाच्या उर्वरित महिन्यांत (जून-फेब्रुवारी) प्रकाशाची तीव्रता त्याच्या लागवडीसाठी आवश्यक असलेल्या इष्टतम पातळीपेक्षा कमी असते. केवळ उन्हाळ्याच्या महिन्यांत (मार्च-मे) तात्पुरत्या शेड नेट स्ट्रक्चरचा वापर केल्याने त्याचा उपयोग आणि खर्चाचे अर्थशास्त्र यांचा ताळमेळ योग्य बसवता येतो.

हे तंत्रज्ञान (Temporary Shade Net Technology) खुल्या शेतीत लागवड करण्याच्या तुलनेत 50 टक्के उत्पादकता आणि 40 टक्के पर्यंत गुणवत्ता सुधारते.

उन्हाळी हंगामात हरितगृह परिणामामुळे, नैसर्गिक हवेशीर पॉलीहाऊसमध्ये माती आणि हवेचे तापमान खूप जास्त असते त्याशिवाय प्रकाशाची तीव्रता देखील खूप जास्त असते. नैसर्गिक वायुवीजन वर्षभर लागवडीसाठी योग्य बनवण्यासाठी तापमान (माती आणि हवा) आणि प्रकाशाची तीव्रता कमी करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरणार आहे.

error: Content is protected !!