बोगस बियाणांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्याची गरज; माण तालुका कृषी विभागाकडून होतय दुर्लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बिदाल प्रतिनिधी ।आकाश दडस

खरीप पेरणी पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून मशागतीच्या कामात शेतकरी वर्ग व्यस्त आहे. मानसूनचे वेळेत आगमन झाल्यास जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरण्या सुरू होण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वीच काही बोगस बियाणांची विक्री होण्याची शक्यता असून त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने अशा विक्रेत्यांवर लक्ष ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

खरीप आणि रब्बी हंगामात बोगस बियाणे विक्रेत्यांचा शिरकाव होतो. काही कंपन्यांकडून विक्रेत्यांना अनधिकृतपणे कमी दरात बियाण्यांचा पुरवठा करून ते बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. बियाणांची उगवण चांगली झाली नाही की शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत राहतात. पण, अशावेळी शेतकऱ्यांनी संबंधित विक्रेत्यांकडून बियाणेखरेदीची पावती न घेतल्यास कृषी विभाग त्या दुकानदारावर कारवाई करण्यासाठी अडचणी निर्माण होतात. शेतकऱ्यांनी बोगस बियाण्यातून सुटका करून घेण्यासाठी खत, कीटकनाशक आणि बियाणे खरेदी करताना पावती घेण्याची गरज आहे. बोगसगिरी करून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास दुकानदार आणि कंपनीवर कारवाई करताना पावती नसल्यास अडचणी निर्माण होतात. बोगस बियाणांपासून होणारी फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

दहिवडी येथील कृषी कार्यालयातील शौचालय व आलेल्या शेतकऱ्यांना पिण्याचे पाण्याची सोय नाही. कार्यालयात शेतकऱ्यांना विविध पिकाच्या संदर्भात वेळेवर मार्गदर्शन मिळत नाही. या कार्यालयाच्या परिसरात गवताचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे. येथील शिपाई सुद्धा वेळेवर काम करत नाहीत. या कार्यालयामध्ये ठराविक एजंट व दलालांची नेमणूक ही कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केली आहे. येथील योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या योजना अजिबात पोहोचत नाहीत.

हे कार्यालय दहिवडी पासून साधारणता दोन ते तीन किलोमीटर अंतरावर गोंदवले रोडवर असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट देणे अडचणीचे ठरत आहे. मात्र ऑनलाईन योजनेची सुद्धा या कार्यालयातील अधिकारी माहिती व्यवस्थित देत नाहीत. तरी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी करत आहेत.

योजना ऑनलाईन झाल्याचे दुःख कृषी अधिकाऱ्यांना

महाराष्ट्र शासनाने कृषी विभागाच्या योजना सर्वसामान्य पर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी अधिकाऱ्यांना योजना ऑनलाईन झाल्यामुळे चहापाण्यासाठी पैसे मिळत नसल्यामुळे खूप दुःख होत आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे. तरी याकडे जिल्हा कृषी अधिकारी यांनी लक्ष दिले पाहिजे अशी मागणी होत आहे.

error: Content is protected !!