‘ही’ आहेत जगातील 5 महागडी फुले; किंमत वाचून व्हाल हैराण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : शेतीत नवनवीन प्रयोग होत असतात. मग ते देशपातळीवर असो की जागतिक पातळीवर असो शेतीत लक्षवेधी बदल होताना दिसत आहेत. अशातच वेगवेगळ्या एकूण ५ देशात वेगवेगळ्या पातळीवर फुलांची शेती केली जाते. या फुलांची किंमत ही आतापर्यंत ऐकली नसतील. मात्र या फुलांची किंमत ऐकल्यास आश्चर्याचा धक्का बसेल. आता आपण समजून घेऊया जगातील सर्वात महाग आणि सुगंधीत फुलांबद्दल. शेतकरी या फुलांची शेती कोणत्या देशात करतात. त्या फुलांची माहिती ही पुढीलप्रमणे नमूद करण्यात आली आहेत.

शेनजेड नांगके ऑर्किड : Shenzhen Nongke Orchid

जगातील सर्वात महाग फुल म्हणून शेनजेड नांगके ऑर्किड हे फुल जगातील सर्वाधिक महाग फुल म्हणून बोललं जातंय. हे फुल दिसायला सुंदर असून याची किंमत ही लाखो रुपयांच्या घरात गेली आहे. २००५ सालात या फुलाची किंमत ही ८६ लाख रुपये असून आतापर्यंत या फुलांच्या किंमतीत वाढ झाली असावी.

सेफरन क्रोकस : Saffron Crocus

हे फुल शेतकऱ्यांसाठी फार उत्पन्न मिळवून देते. याचे एक वेगळा महत्त्व असून या फुलापासून केसर बनवता येत असून आज बाजारात केसरला २ लाखाएवढं उत्पन्न आहे. यामुळे याचा फायदा या फुलाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक होतो.

अमूल्य फुल :

अमूल्य फुलाची शेती ही श्रीलंकेत केली जाते. श्रीलंकेत या फुलाला काडीपूल या नावाने ओळखले जात असून या फूलाचे मुख्य वेगळेपण म्हणजे हे फुल काही तासांसाठी उगवते. अशावेळी या फुलाला खरेदी करणे खूप कठीण असते.

ट्युलीप : Tulip

१७ व्या शतकात ट्युलीपची मागणी जगात वाढली. यामुळे या फुलांच्या दरात वाढ झाली आहे. पूर्वी काश्मीर ठिकाणी या फुलाची शेती केली जात असून एका फुलाचा दर हा ५०० रुपयांहून अधिक आहे.

गार्डेनिया : Gardenia

गार्डेनिया हे फुल दिसायला आकर्षित आणि सुंदर आहे. यामुळे याचा वापर सजावटीसाठी करतात. बऱ्याचदा या फुलाचा वापर हा लग्नातील सजावटीसाठी केला जातो. यामुळे या एका फुलाची किंमत ही १००० ते १६०० रुपये आहे.

error: Content is protected !!