‘हे’ आहे जगातील सर्वात महाग अननस ! वाढवण्यासाठी खर्च येतो एक लाख रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो कृषी ऑनलाईन : एक अननस पिकवण्यासाठी लाखो रुपये खर्च येतो. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. इंग्लंडच्या हेलिगनच्या गार्डन्समध्ये एक अननस वाढवण्यासाठी इतकाच खर्च येतो. तयार होण्यासाठी सुमारे 2-3 वर्षे लागतात. या फळाचे नाव हेलिगन अननस असून, या फळाचे नाव बागेवरूनच ठेवण्यात आले आहे.

या ट्रिक ने केली जाते लागवड

इंग्लंडचे हवामान अननसाच्या लागवडीसाठी योग्य नाही. अननस लागवडीसाठी उष्ण हवामान पोषक असते. अशा परिस्थितीत युक्तीच्या सहाय्याने त्याची लागवड केली जाते. मिरर वेबसाइटनुसार, हे अननस डिझायनर लाकडी खड्ड्याच्या आकाराच्या भांड्यांमध्ये घेतले जाते. एका भांड्यातून फक्त एक अननस तयार होतो आणि त्याच्या पोषणासाठी घोड्याचे खत दिले जाते.

हे फळ विकले जात नाही

अननस पिकवण्यासाठी एक लाख रुपयांपर्यंत खर्च येतो, असा दावा केला जातो.ते पिकवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते हे फळ विकत नाहीत तर ते उच्चभ्रू लोकांना भेट देतात. मात्र, या फळाचा लिलाव झाल्यास केवळ एका अननसातून 10 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल, असा त्यांचा अंदाज आहे. Heligan.com वेबसाइटनुसार, हे अननस प्रथम 1819 मध्ये ब्रिटनमध्ये आणण्यात आले होते. उद्यान अधिकाऱ्यांना अननस मिळाल्यानंतर सुमारे 60 ते 70 वर्षांनंतर 1991 साली त्याची लागवड सुरू करण्यात आली.

राणी एलिझाबेथला दिली होती भेट

Heligan.com वेबसाइटनुसार, हेलिगनच्या लॉस्ट गार्डनमध्ये उगवलेले या वनस्पतीचे दुसरे अननस राणी एलिझाबेथ यांना भेट म्हणून देण्यात आले होते.हेलिगन गार्डनर्सनी पहिले अननस चवीला वाईट आहे की नाही हे तपासण्यासाठी खाल्ले. प्रिन्स चार्ल्स 1997 मध्ये हे अननस फळ पाहण्यासाठी बागेला भेट देण्यासाठी आले होते.

error: Content is protected !!